Monday, October 14, 2024
Home मराठी ‘बाई वाड्यावर…’ फेम मानसी नाईकचा घटस्फोट? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

‘बाई वाड्यावर…’ फेम मानसी नाईकचा घटस्फोट? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

मराठी अभिनेत्री मानसी नाईक(Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैली आणि अभिनयासाठी ओळखली जाते.’वाट माझी बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर’ या दोन्ही गाण्यामुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी चित्रपटातून गायब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. सध्या मानसीच्या वैयक्तिक आयुष्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. मानसीचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा(Pradeep Kharera) यांच्यासोबत 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. थाटामाटात त्या दोघांचा विवाह पार पडला होता. हळद, मेहंदी आणि लग्न असा तीन दिवसांचा सोहळा धुमधडाक्यात पार करण्यात आला होता. नुकतेच मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या प्रदीपच्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत.

सोबतच त्यांचे सर्व रोमँटिक फोटो आणि फोटोशूट केलेल्या पोस्टही तिने काढून टाकल्या आहेत. इतकंच नाही तर तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरील खरेरा हे आडनावही हटवलं आहे. त्याचबरोबर तिच्या नवऱ्यानेदेखील दोघांचे एकही फोटो शेअर केलेले नाही. त्यामूळे दोघांत काही बिनसलं आहे का अशा चर्चांना उधान आले आहे.

 

View this post on Instagram

 

 

अलीकडेच मानसी नाईकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत तिने लिहिलं की, “वाईट बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही”. त्यानंतरच ही दोघं लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चाना उधान आलं आहे. पण मानसी-प्रदीपने अद्याप या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. तसेच त्यांच्या नात्याविषयी अधिकृत भाष्य केलेले नाही. त्यामुळे या दोघांमध्ये सगळं काही ठिक असावं अशी आशा त्याचे चाहते करीत आहे.(marathi actress manasi naik pradeep kharera get divorce actress deleted all wedding photos and video in social media account)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मायके गयी थी ससुराल लौटी हुॅं’; म्हणत अर्चना गौतमची बिग बॉसच्या घरता धमाकेदार एंट्री

‘पुढचा प्रवास खडतर असेल, तर…’, म्हणत अमेय वाघने वाढदिवशी स्वतःलाच दिली ‘ही’ खास भेट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा