Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड हिजाब वादादरम्यान मंदाना करीमीच्या पोस्टने वेधले लक्ष, प्रदर्शन करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ केला शेअर

हिजाब वादादरम्यान मंदाना करीमीच्या पोस्टने वेधले लक्ष, प्रदर्शन करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ केला शेअर

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बाॅस 9’ शाे ची दुसरी विजेता मंदाना करीमी हिने ‘क्या कूल हैं हम 3’, ‘भाग जाॅनी’ यासारख्या अनेक दमदार चित्रपटात काम केलं आहे. मंदानाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जमाव प्रशासनाविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इराणमधील आहे, जिथं हिजाब सक्तीच्या विरोधात तीव्र विरोध होत आहे.

हिजाबच्या विरोधात इराणमध्ये तीव्र प्रदर्शन
मंदाना करीमी (Mandana Karimi) हिने त्यासोबत एक नाेट देखील लिहिली आहे. तिने लिहिले की, “कोणत्याही पक्षाचा दोष असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. मी पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून मला संधी मिळताच सर्व प्रकरणांची चौकशी करेन. तुम्ही तेच कराल हे आम्हाला माहीत होते, पण तुम्ही आंदोलक आणि दंगलखोर यांच्यात फरक करा. गेल्या 7 दिवसात आम्ही 33 जण गमावले आहेत. अनेकांवर गोळीबार झाला आहे. अनेकांना अटक करण्यात आली आहे आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ पाहा आणि तुम्हीच ठरवा.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manizhe karimi (@mandanakarimi)

मंदाना करीमी हिचा हिजाब अनिवार्य करण्यास विरोध
मंदाना करीमी ही इराणची असून तिचा हिजाब अनिवार्य करण्यास विरोध आहे. त्याबाबत ती अनेकदा उघडपणे बोलली आहे. आता इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तिने आपले मत मांडले आहे. यावर मंदाना करीमीचे अनेकांनी सोशल मीडियावर समर्थनही केले आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Manizhe karimi (@mandanakarimi)

मंदाना करीमीने अनेक चित्रपटांमध्ये साकारल्या म्हत्वाच्या भूमिका
मंदाना करीमी ही एक अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. मंदाना करीमी नुकतीच ‘लॉकअप सीझन 1’मध्ये दिसली होती. तिची जोडी अनेक अभिनेत्यांसोबत चांगली दिसते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अपूर्णच राहिली राजूंची ‘ही’ इच्छा, दिवाळीला रिलीज होणार कॉमेडियनचा शेवटचा सिनेमा
अमृताच्या साडीतील मनमोहक अदा, एका क्लिकवर पाहा फोटो गॅलेरी
‘माझी मुलगी असतीस तरी मी तुझ्यासोबत…’, टेलिव्हिजन अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

हे देखील वाचा