Saturday, September 30, 2023

‘मी हार मानणार नाही…’ म्हणत मानसीने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; युजर म्हणाले, ‘तुझी साडी…’

अभिनेत्री मानसी नाईक हिला मराठी मनोरंजनविश्वातील ऐश्वर्या राय म्हणून ओळखले जाते. मागील खूप दिवसांपासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री मानसी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असते. मानसी नेहमी तिच्या नृत्य कलेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मानसीने मराठी मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आह. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

मानसी (Manasi Naik) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्याचे मनोरंजन करत असते. मानसीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसतात. अशातच आता मानसीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या या व्हिडिओचे कॅप्शन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

काही महिन्यांपुर्वी मानसीने तिचा नवरा प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले. मानसीने शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, “धन्यवाद विश्व. मी हार मानणार नाही.” तिने हे लिहिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये मानसी एका जुण्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी घातलेली दिसत आहे आणि कानात मोठे झुमके घातलेले दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

तिच्या या व्हिडिओवर खूप मज्जेशीर कमेंट आल्या आहेत. एका महिला युजरने कमेंट करताना लिहिले की, “मला तुझी साडी दे.” दुसऱ्याने लिहिले की, “हु मैं दिवाना तेरे नाम का.” आणखी एकाने लिहिले की,”तुला एक कोल्हापुरकर मिळेल.” अशा साऱ्या कमेंट केल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत. (Actress Mansi Naik’s dance video goes viral)

अधिक वाचा- 
आनंददायी! ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता झाली आई, बाळाच्या जन्मानंतर सेलेब्रिटी कपलवर शुभेच्छांचा वर्षाव
गर्विष्ठपणा नडला! ‘लगान’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री ग्रेसी सिंग बॉलिवूडमधून का झाली गायब?

हे देखील वाचा