Thursday, September 28, 2023

आनंददायी! ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता झाली आई, बाळाच्या जन्मानंतर सेलेब्रिटी कपलवर शुभेच्छांचा वर्षाव

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणजे इशिता दत्ता आणि वत्सल सेठ. मागील अनेक दिवसांपासून हे दोघं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे रिल्समुळे कमालीचे गाजत असतात. मधल्या काही काळापासून ते आईबाबा होणार या बातमीमुळे ते सतत मीडियामध्ये गाजत होते. इशिता सोशल मीडियावर तिच्या या प्रेगनन्सीच्या काळातील सर्वच अपडेट तिच्या चाहत्यांना देत होती. मात्र आता वत्सल आणि इशिता एका मुलाचे आईबाबा झाले आहे.

हो इशिताने १९ जुलै रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. इशिताच्या डिलिव्हरीनंतर आता वत्सल आणि इशिता यांच्यावर त्याच्या फॅन्सकडून, इंडस्ट्रीमधील मैत्र मैत्रिणी , नातेवाइकांनी शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर तर त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांचा जणू पूर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vatsal Sheth (@vatsalsheth)

एका मोठ्या वृत्त संस्थेनुसार सध्या इशिता सध्या हॉस्पिटलमध्ये असून, ती आणि बाळ दोघेही एकदम सुखरूप आहे. इशिताला शुक्रवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. बाळाच्या आगमनामुळे त्या दोघांच्याही घरी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान इशिताने १८ जुलै रोजीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने “हा शेवटचा महिना अजिबातच सोपा नाही.” असे लिहीत तिचा एक सेल्फी पोस्ट शेअर केला होता. आणि लगेच बुधवारी तिची डिलिव्हरी झाली.

दरम्यान इशिता आणि वत्सल यांनी मार्च महिन्यात ते आईबाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर सतत फॅन्ससोबत त्याचे या काळातील अनुभव, मजामस्ती सर्व शेअर केले होते. सोबतच इशिता आणि वत्सलने शूट केलेले मॅटर्निटी फोटो कमालीचे व्हायरल देखील झाले होते. काही दिवसांपूर्वी इशिताचे बंगाली पद्धतीनुसार डोहाळे जेवण देखील झाले होते. यासोबत तिच्या मैत्रिणींनी देखील तिच्यासाठी खास मेजवानी आयोजित केली होती.

तत्पूर्वी इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी नोव्हेंबर २०१७ साली लग्न केले होते. त्यानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले. एका मालिकेदरम्यान त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. इशिताने दृश्यम सिनेमासोबत अनेक चित्रपटनमध्ये काम केले असून, वत्सलने टारझन द वंडर कारमध्ये काम करत या क्षेत्रात पदार्पण केले.

हे देखील वाचा