×

पेढा की बर्फी? अभिनेत्री मीनाक्षी राठोडने दिला गोंडस बाळाला जन्म

सध्या मराठी तसेच हिंदी सिने जगतात अनेक अभिनेत्री गूड न्युज देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच टिव्ही अभिनेत्री मृणाल दुसानिसने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आता पून्हा एकदा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री मिनाक्षी राठोडच्या (Meenakshi Rathod) घरी चिमुकल्या पाहुण्यांच आगमन झालं असून मिनाक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळेच या मालिकेच्या आणि मिनाक्षीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Meenakshi Rathod (@minaxirathod17__original)

अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेतील तिच्या देवकीच्या भूमिकेचे घराघरातून कौतुक होत आहे. या मालिकेनेच मिनाक्षीला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. तत्पुर्वी काही महिन्यांपूर्वीच मिनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या प्रेन्संसीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. तसेच तिने अनेकदा बेबी बंप फ्लॉंन्ट करतानाचेही फोटो पोस्ट केले होते.आता मिनाक्षीने मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मिनाक्षीकडून किंवा तिच्या पतीकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Meenakshi Rathod (@minaxirathod17__original)

अभिनेत्री मिनाक्षी राठोड प्रमाणेच तिचा पती कैलाश वाघमारे ही विविध नाटकांमध्ये काम करत असतो. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच अभिनेत्री मिनाक्षीनेही सुख म्हणजे नक्की काय असंत या मालिकेसोबतच बाळूमामाच्या नावानं चांगभल मालिकेतही काम केले होते. २०१८ मध्ये आलेल्या याच मालिकेतून मिनाक्षीने आपल्या अभिनय कारकिर्दिला प्रारंभ केला होता. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे आणि भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. सध्या मिनाक्षीने दिलेल्या गोड बातमीमुळे तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Latest Post