×

‘…माझा वाढदिवस साजरा करणे बंद केले होते’, जन्मदिनी भावुक झाला विजय देवरकोंडा

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने (Vijay Devarkonda) सोमवारी (९ मे) त्याचा ३३वा वाढदिवस साजरा केला. विजयसाठी यंदाचा वाढदिवस खूप खास होता. अभिनेता लवकरच ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर विजयने चाहत्यांचे खास आभार मानणारी, एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.

खरं तर, विजय देवरकोंडाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विजयसोबत त्याची आईही दिसत आहे. फोटोमध्ये विजय त्याच्या आईला प्रेमाने धरून उभा असलेला दिसत आहे. या फोटोसोबत त्याने एक लांबलचक इमोशनल नोटही लिहिली आहे. अभिनेत्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे त्यांच्यासाठी, ज्यांनी मी १५ वर्षांचा असताना माझा वाढदिवस साजरा करणे बंद केले होते.” (vijay deverakonda wrote a emotional note)

अभिनेत्याने पुढे लिहिले की, “८ वर्षांपूर्वी तुम्हाला माझे नाव, माझे अस्तित्व माहित नव्हते. परंतु आज तुम्ही मला शुभेच्छा देत आहात, पाठिंबा देत आहात, माझ्यासाठी लढत आहात आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम करत आहात. मला एवढेच सांगायचे आहे की, मी हे सर्व तुम्हालाही नक्कीच परत करेन. किंवा असे म्हणतो की, जेवढे प्रेम मला तुम्हा लोकांकडून मिळत आहे, तेवढेच प्रेम तुम्हाला माझ्याकडूनही नक्कीच मिळेल.”

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

 

नुकतेच विजयने त्याच्या संघर्षाचे दिवस आठवत त्याबद्दल सांगितले होते. संघर्षाचे दिवस आठवत त्यांनी सांगितले की, पहिले दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याला २ वर्षे घरीच बसावे लागले. त्याला अभिनयात काम मिळणे बंद झाले होते. यादरम्यान, “माझ्या करिअरच्या चिंतेने घरच्यांनीही माझ्यावर अभिनय सोडण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली,” असेही अभिनेता म्हणाला होता.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर विजय देवरकोंडा लवकरच ‘लायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता सध्या काश्मीरमध्ये आहे. या चित्रपटातील विजयच्या लूकला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post