×

जेव्हा नोरा अन् मलायका आल्या आमनेसामने! पाहा कोणाचा डान्स अन् स्टाईल पाहून दंग झाले प्रेक्षक

नोरा फतेही (Nora Fatehi) एक अद्भुत डान्सर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. बेली डान्सपासून ते अरबी डान्समध्ये पारंगत असलेली नोरा फतेही आता भारतीय डान्सही शिकत आहे. डान्स हा तिचा छंदच नाही तर, तिचे वेड आहे. जो तिच्या प्रत्येक म्युझिक व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतो. दुसरीकडे मलायका अरोराबद्दल (Malaika Arora) बोलायचे झाले, तर तिच्याही डान्सचे लाखो चाहते आहेत. ‘छैय्या छैय्या’पासून ते ‘अनारकली डिस्को चली’पर्यंत तिने आपल्या गाण्यांनी सगळ्यांच्याच मनाचा ठाव घेतला आहे. तुम्ही या दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करताना पाहिलेच असेल. पण जर या दोन डान्सिंग दिवा एकाच मंचावर असतील तर?

डान्स फेस ऑफ करताना दिसल्या मलायका आणि नोरा
‘इंडिया बेस्ट डान्सर’च्या स्टेजवर हे घडले, जेव्हा नोरा फतेही आणि मलायका अरोरा यांनी एकत्र येऊन स्टेजवर आग लावली. नोरा फतेहीच्या ‘हाय गर्मी’ या गाण्यावर मलायकाने असा डान्स केला की, स्टेजचा पाराच वाढला. तर नोरानेही मलायकाच्या ‘मुन्नी बदनाम’ या गाण्यावर धुमाकूळ घातला. देसी स्टाईलमध्ये नोराने असा डान्स केला की, प्रेक्षक पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले. (nora fatehi and malaika arora dance face off on the set of india best dancer)

बेली डान्समध्ये पारंगत आहे नोरा
नोरा फतेही बेली डान्सरमध्ये पारंगत आहे आणि ती खूप सुंदर बेली डान्स करते. मलायकाबद्दल बोलायचे झाले, तर तिनेही २ दशकांपूर्वी डान्स मास्टर टेरेन्स लुईसच्या डान्स स्कूलमधून डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. अनेक गाण्यांमध्ये दिसणार्‍या या दोन्ही सुंदरी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ला एकत्र जज करताना दिसल्या होत्या. मलायका या शोची पहिल्यापासून जज होती, तर नोरा पाहुण्या जजच्या भूमिकेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post