सध्या मराठी सिनेसृष्टीत आणि बॉलिवूडमध्ये अनिक अभिनेत्री मातृत्वाचा आनंद लुटत आहेत. आपल्या प्रेग्नेंसीच्या बातम्या चाहत्यांना देत आहेत. अलिकडेच लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसनेही आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. मृणालने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली होती. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच मिनाक्षी राठोड. अभिनेत्री मीनाक्षी राठोडने (Meenakshi Rathod) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही बातमी दिली आहे.
सध्या छोट्या पडद्यावर ‘सुखं म्हणजे नक्की काय’ असतं मालिका चांगलीच चर्चेत आहे. याच मालिकेतील प्रमूख भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने आपल्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. मीनाक्षी सध्या मातृत्वाचा आनंद घेत असून, तिने पती कैलाश वाघमारे सोबत सुंदर फोटोशूटही केले आहे. ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने यासंबंधी बऱ्याच पोस्ट केलेल्या दिसत आहेत. ज्यामध्ये ती कधी पतीसोबत तर कधी एकटीच आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. मीनाक्षीच्या या व्हायरल पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान अभिनेत्री मीनाक्षी राठोड ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेतील अभिनयाचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. आपल्या अभिनयांप्रमाणेच मिनाक्षी तिच्या सोशल मीडियामुळेही नेहमीच चर्चेत असते. मूळची जालन्याची असलेल्या मिनाक्षीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असल्यापासून तिने नाटकात भाग घ्यायला सुरूवात केली होती. २०१८ मध्ये आलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभल’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –