Tuesday, April 16, 2024

जेव्हा अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखने व्यक्त केलं दुःख, ऐश्वर्याबद्दल बोलला होता ‘मोठ्ठी’ गोष्ट

बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानची (Shahrukh Khan) फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. बॉलिवूड अभिनेत्री असो किंवा सामान्य महिला, क्वचितच कोणाला त्याची बहीण बनण्याची इच्छा असावी. चित्रपटांमध्येही फार कमी अभिनेत्री शाहरुख खानच्या बहिणीच्या भूमिकेत दिसल्या आहेत. या यादीत ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchan) नावाचाही समावेश आहे. मात्र, जगातील सर्वात सुंदर महिला आपली बहीण झाल्याची खंत शाहरुखला नेहमीच वाटत असते. काही वर्षांपूर्वी शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘जोश’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

असे म्हणता येईल की, ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. शाहरुख खानला त्याच्या पहिल्याच चित्रपटात ऐश्वर्याला बहीण बनताना पाहून खूप वाईट वाटले. एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान, जेव्हा शाहरुख खानला ऐश्वर्या रायला ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आले, तेव्हा त्याने त्याच्या मनातले दुःख व्यक्त केले. यावेळी शाहरुख म्हणाला की, “मी खूप दुर्दैवी आहे की, मला ऐश्वर्यासोबतच्या पहिल्याच चित्रपटात तिचा भाऊ बनावे लागले.” (shahrukh khan revelation on working with aishwarya rai bachchan)

तो म्हणाला की, “जगातील सर्वात सुंदर स्त्रीला आपली बहीण कोणाला बनवू वाटेल? या चित्रपटात ऐश्वर्या माझी जुळी बहीण होती. लोक म्हणायचे की, आमचे चेहरे जुळतात.” शाहरुख पुढे म्हणाला की, “ऐश्वर्याचा भाऊ व्हावं लागलं याची मला आजही खंत आहे.” त्यानंतर शाहरुख खाननेही मोहब्बतें आणि देवदास या चित्रपटाचा उल्लेख केला. शाहरुखने सांगितले की, “देवदासमध्ये सर्व काही ठीक होते, पण आधी मी ऐश्वर्याला सोडले आणि नंतर ऐश्वर्याने माझ्याशिवाय दुसऱ्याशी लग्न केले.” शाहरुखच्या म्हणण्यानुसार, त्याला ऐश्वर्यासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करण्याची संधीच मिळाली नाही.

याबाबत बोलताना शाहरुख खान पुढे म्हणाला की, “‘मोहब्बतें’मध्ये तर ऐश्वर्या भूतनी होती. मला ऐश्वर्यासोबत एक सामान्य चित्रपट करायचा आहे. आता आम्ही दोघेही पालक झालो आहोत. आमच्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी आमची भेट होते.”

ऐश्वर्या आणि शाहरुख शेवटचे ये दिल है मुश्कील चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात शाहरुखने ऐश्वर्याच्या पतीची भूमिका साकारली होती. पण यात नंतर दोघांचा घटस्फोट होतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा