औरंगाबादमध्ये आंतरजातीय विवाहामुळे झालेल्या खुणाने हळहळलाय महाराष्ट्र! ‘या’ अभिनेत्रीनेही केले मत व्यक्त


आजकाल आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह या घटना नेहमीच घडत असतात. परंतु या गोष्टी आता अगदी सर्वसामान्य समजल्या जातात. परंतु आजही समाजात असे काही लोकं आहेत, ज्यांचा प्रेमविवाह या गोष्टीस नकार आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. आपल्या बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे, एका मुलाने तिचे मुंडके उडवले आहे. यावर आता कलाकारांनी देखील त्यांची मते मांडली आहेत. तिचे मुंडके कापल्यानंतर देखील तिची आई त्या कापलेल्या डोक्याला शिव्या देताना दिसत आहे. या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

कीर्ती नावाच्या एका मुलीने घरच्यांच्या परवानगीविना घरातून पळून जाऊन विवाह केला. त्यामुळे तिचा खून करण्यात आला आहे. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. हा प्रकार अलीकडेच घडला आहे. याबाबत आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील मॅडहेड म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने तिचे मत व्यक्त केले आहे. तिने फेसबुकवर काही फोटो शेअर करून तिचे मत व्यक्त केले आहे. (Sukh mhanje nakki kay asta actress meenakshi Rathod reacted on vaijapur kirti murder case)

तिने लिहिले आहे की, “आई…मोठ्या ताईचं आंतरजातीय लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताईचा. माझं कैलाशसोबत आंतरजातीय लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली! काल परवा आपल्या लहान मुलीचं ही आंतरजातीय लग्नं मोठ्या थाटात लावून दिलंस आणि सगळ्यांनाच जणू हिच कशी नवीन जनरीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला ५ मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग कंट्रोल केलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?”

तिने पुढे लिहिले आहे की, “हे असंच “कीर्ती थोरे “च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातीतच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं यापेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्यासारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई!”

 

 

तिने पुढे लिहिले की, “काल परवाच सकारात्मक वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो स्वॅग तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा स्वॅग खऱ्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्रीमध्ये येवो!”

तिची ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकजण तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिचे आणि तिच्या आईचे कौतुक करत आहेत. तसेच झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा –


Latest Post

error: Content is protected !!