तुझी-माझी जोडी जमली रे! घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा पडली प्रेमात; स्वत:च केले कबूल


अफेअर, रिलेशनशिप, लग्न या सर्व गोष्टींमुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. आता यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ती अभिनेत्री इतर कुणी नसून मिनिषा लांबा आहे. मिनिषा आपल्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

मागील काही दिवसांपासून तिच्या लव्हलाईफवरील बातम्यांनी जोर धरल्यानंतर नुकतेच अभिनेत्रीने आपल्या बॉयफ्रेंडचे नाव आणि त्याचा चेहरा जाहीर केला आहे. तसेच आपल्या नात्यावर मोहर लावली आहे. मिनिषाच्या बॉयफ्रेंडचे बॉलिवूडशी कोणतेही नाते नाही. तो एक व्यावसायिक आहे. दोघांचीही पहिली भेट ही सन २०१९ मध्ये एका पोकर चॅम्पियनशिप इव्हेंटमध्ये झाली होती. (Actress Minissha Lamba Confirms Dating Delhi Based Businessman Akash Malik Says I Feel Blessed)

मिनिषा लांबाने नुकतेच आपल्या रिलेशनशिपबाबत सांगितले की, ती सध्या दिल्ली येथील व्यावसायिक आकाश मलिकला डेट करत आहे. ईटाइम्सशी बोलताना ती म्हणाली की, “होय. मला माझे प्रेम मिळाले आहे आणि मी आनंदी आहे. मी प्रत्येक दिवशी त्याची साथ भेटल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजते.”

माध्यमातील वृत्तानुसार, मिनिषा आणि आकाश सुरुवातीला फक्त मित्र होते. त्यांनी कधीही एकमेकांना फोनही केला नव्हता. मात्र, ते पोकर चॅम्पियनशिपदरम्यान जवळ आले. मैत्रीनंतर दोघांनीही जवळपास १७-१८ महिन्यानंतर एकमेकांना पहिल्यांदा पाहिले होते.

मिनिषाने आकाशसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे. फोटोत ती आकाशच्या हातात हात टाकून कँडल लाईट डिनरचा आनंद लूटताना दिसत आहे.

रिलेसनशिपबाबत नुकतेच तिने म्हटले होते की, “कधी-कधी ब्रेकअपसाठी कोणालाही जबाबदार ठरवले जात नाही. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत आणि कोणीही चुकीचे केलेले नसते, अशात तुम्ही कोणालाही जबाबदार ठरवू शकत नाहीत. मला असे म्हणायचे आहे की, कोणत्याही नात्याचे किंवा लग्नाचा शेवट हा आयुष्याचा शेवट नसतो. तुम्हाला प्रेम करण्याची दुसरी संधी मिळते. असे झाल्याने तुम्ही तुमचा भूतकाळ मागे सोडता.”

मिनिषाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘हनीमून ट्रॅव्हेल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘बनचा ऐ हसीनों’, ‘किडनॅप’, ‘वेल डन अब्बा’ आणि ‘हम तुम शबाना’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. सन २०१४ मध्ये मिनिषा ‘बिग बॉस ८’मध्ये झळकली होती. मात्र, शोमध्ये एका महिन्यानंतरच तिला निरोप देण्यात आला होता.

सध्या ती आपल्या पहिल्या डिजिटल प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.