Sunday, October 1, 2023

मौनी रॉय 9 दिवसांनंतर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पोस्ट शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यतचा प्रवास करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मौनी राॅय होय. मौनीने आपल्या दमदार अभिनयाने वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मौनीने नागिन या मालिकेत शिवांगी हे पात्र साकारले आहे. तिला त्या पात्रामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. तिला बाॅलिवूड इंडस्ट्रीमधील आगाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतीच मौनीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली होती.

मौनी (Mouni Roy) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मौनीच्या पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंट करत असतात. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मौनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच धुमाकुळ घालत आहे.

पोस्ट करताना मौनीने लिहिले की, “मी 9 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. मी अजूनही हाच विचारात करत आहे की, मी कोणत्याही गोष्टीचा विचार करून इतकी अस्वस्थ होते. पण आता मला शांतता मिळाली आहे. मी घरी परतले आहे. हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आता हळूहळू बरी होत आहे. परंतु माझी प्रकृती चांगली आहे. प्रत्येक चुकीनंतरआयुष्याचला चांगली दिशा मिळते. मी माझ्या जवळच्या आणि प्रिय मित्रांचे आभार मानते. ज्यांनी या काळात माझी काळजी घेतली.”

तसेच, तिने तिच्या पतीचे आभार मानले आहेत. त्याच्या बद्दल ती म्हणाली की, “तुझ्यासारखा कोणी नाही, मी सदैव तुझी ऋणी राहीन ओम नमः शिवाय.” मौनीची ही पोस्ट पाहून तिचे चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. यावर मृणाल ठाकूरने कमेंट करत लिहिले की,”काय झाल बाळा? तु बरा आहेस का ? माझी बाहुली लवकर बरी हो. मौनीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. (Actress Mouni Roy discharged from hospital after 9 days)

अधिक वाचा- 
जुई गडकरीकडून इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना मदतीचा हात; लोकांना केले ‘हे’ आव्हान
अभिनेत्रीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधला सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “दिग्दर्शक, निर्माता अन् प्रमुख अभिनेत्याबरोबर…”

हे देखील वाचा