Thursday, September 28, 2023

अभिनेत्रीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधला सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “दिग्दर्शक, निर्माता अन् प्रमुख अभिनेत्याबरोबर…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रतन राजपूत होय. तिने त्या मालिकेत काम करून खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

रतन ( Ratan Rajput) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या पोस्टवर चाहते देखील लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. रतन ब्लाॅग देखील चालवते. ब्लाॅगच्यामाध्यामातून ती युजरला सतत अपडेट देत असते. नुकतेच रतनने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या कास्टिंग काउचची चादर उघडून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्याचबरोबर आता तिने साऊथ इंडस्ट्रीतील काळे सत्य समोर आणले आहे.

प्रेक्षकांना साऊथ इंडस्ट्री खूप छान वाटते, पण तिथेही कास्टिंग काउच खूप प्रचलित आहे. माध्यामांशी बोसताना रतन म्हणाली की, “जेव्हा मी ‘अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो’ मालिका करत होती, तेव्हा मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून खूप फोन आले होते. काही खूप चांगल्या दिग्दर्शकांचे, पण त्याच वेळी ते म्हणायचे की, रतन जी तुम्हाला वजन वाढवावे लागेल. कारण तुम्ही खूप पातळ आहात.” त्या गोष्टाचा रतनला खूप राग यायचा.

पुढे बोलताना रतन म्हणाला की, एक व्यक्ती मला फोन करून बोलत होता. त्यावेळी तो म्हणाला की, तुम्हाला या इंडस्ट्रीमधले नियम माहीत असतील. त्यानंतर मी त्या व्यक्तीला कसले नियम असे विचरले. तेव्हा ती व्यक्ती बोलली की, ‘तुम्हाला माहीत असेल की, इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख अभिनेता आणि कदाचित डीओपीबरोबर…’ यानंतर मी त्याला स्पष्ट विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, ‘इथे तुम्हाला तडजोड करावी लागते.’ ते ऐकून मी प्रोजेक्ट नाकारला. (Actress Ratan Rajput tells about the shocking incident in the southern industry)

अधिक वाचा- 
अभिनेत्री कृती शेट्टी घेतेय पावसाची मजा, पाहा नयनरम्य फोटो
उर्फी जावेदचा विनयभंग; धक्कादायक खुलासा करत म्हणाली ‘मुले घाणेरडे बोलत होते आणि…’

हे देखील वाचा