Saturday, June 29, 2024

एकदम गुपचूप कारभार! लग्नाच्या 4 महिन्यात अभिनेत्री नयनतारा बनलीये जुळ्या मुलांची आई, विश्वास नसेल तर फोटो पाहा

साउथची लाेकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन हे 9 जून 2022ला लग्न बंधनात अडकले. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्नानंतर हे जोडपे चर्चेत होते. आता लग्नाच्या चार महिन्यानंतर, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हे जाेडपे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. अलीकडेच विघ्नेशने सोशल मीडियावर नयनतारासोबत मुलांच्या पायाचे चुंबन घेत एक पोस्ट शेअर केली आहे. हे पाेस्ट साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असून चाहते या जाेडप्याचे अभिनंदन करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

विघ्नेश शिवनने जुळ्या मुलांच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर सर्वांना दिली आहे. त्याचवेळी त्याने नयनतारासोबतचे दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मुलांचे पाय धरून चुंबन घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो हसत आहे. यासोबत विघ्नेशने लिहिले की, “नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्ही जुळ्या मुलांचे पालक झालो आहोत. आमच्या सर्व प्रार्थना, आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि सर्व चांगले विचार, आमच्यासाठी 2 मुलांच्या स्वरुपात एकत्र आले आहेत. आमच्या उइरो आणि उलगमसाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आयुष्य अधिक सुंदर दिसत आहे.”

जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांचे केले स्वागत
विघ्नेश शिवनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते या जोडप्याला आणि त्यांच्या नवजात मुलांना खूप प्रेम देत आहेत. मात्र, लग्नाच्या चार महिन्यांनंतर नयनतारा आणि विघ्नेश आई-वडील झाल्याबद्दलही काही चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. पण या जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांचे या जगात स्वागत केले आहे.

नयनताराच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर नयनतारा ऍटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसणार आहे. नयनतारासोबत प्रसिद्ध चित्रपट निर्माते ऍटली देखील पहिल्यांदाच किंग खानसोबत काम करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्यो! उर्फी जावेदला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली मोनू देओरी, पाहा भन्नाट व्हिडिओ
कुछ तो गळबळ है! सनी कौशल शर्वरी वाघसोबत गेला डिनर डेटवर, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा