Friday, May 24, 2024

पाच वर्षाच्या रिलेशननंतर विघ्नेश आणि नयनताराने थाटला संसार, ‘अशी’ आहे त्यांची लव्हस्टोरी

साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक विघ्नेश शिवन त्याच्या दमदार कामासाठी ओळखला जातो. त्याने अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि या कारणास्तव ते हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांमध्ये कमी लोकप्रिय नाहीत. पण त्याच्या कामापेक्षा विघ्नेश आता त्याच्या लव्ह लाईफमुळे प्रसिद्धी मिळवत आहे. विघ्नेशने काही काळापूर्वी साऊथ इंडस्ट्रीची सुपरस्टार नयनतारासोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. पण आज विघ्नेश त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया विघ्नेश आणि नयनताराच्या प्रेमकथेबद्दल….

विघ्नेश (Vighnes shivan) आणि नयनताराचे (Nayantara) लाखो चाहते आहेत. दोघांना एकत्र बघून चाहत्यांच्या खूप आवडते. पण त्यांच्या आवडत्या जोडप्याच्या पहिल्या भेटीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. विघ्नेश आणि नयनतारा यांची पहिली भेट ‘ननुम राउडी धन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विघ्नेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता आणि नयनतारा या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

सिनेविश्वातील बाकीच्या जोडप्यांप्रमाणेच विघ्नेश आणि नयनतारानेही आपले नाते काही काळ जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले. 2015 मध्ये त्यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि जवळपास एक वर्ष दोघेही सार्वजनिक ठिकाणी फक्त चांगले मित्र म्हणून भेटायचे. पण 2016 मध्ये दोघांनीही एका अवॉर्ड फंक्शनमध्ये कपलप्रमाणे एन्ट्री करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या अवॉर्ड नाईटमध्ये विघ्नेश आणि नयनताराने त्यांचे नाते सार्वजनिक केले.

विघ्नेश शिवन आणि नयनतारा यांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आणि जून 2022 मध्ये विघ्नेश आणि नयनताराने त्यांचे नाते लग्नाच्या टप्प्यापर्यंत नेले. विघ्नेश आणि नयनताराचे लग्न खूप हाय प्रोफाईल होते. दोघांच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये साऊथसोबतच अनेक बॉलिवूड कलाकारही दिसले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पंजाबी ड्रेसमध्ये खुललं प्राजक्ताचं सौंदर्य, पाहा फोटो गॅलेरी
‘ती आठवड्यातून तीन वेळा…’, लेकीच्या कॉस्मेटिक सर्जरीच्या उलटसुलट चर्चांवर स्पष्टच बोलली काजोल

हे देखील वाचा