Friday, March 29, 2024

नयनतारा अन् विघ्नेश शिवनने बदलला वेडिंग प्लॅन, ‘या’ गोष्टीत केला मोठा बदल

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan आणि तामिळ-तेलुगू सिनेमांची सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ९ जून रोजी दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. पाहुण्यांच्या यादीपासून ते मेनूपर्यंत, सर्वकाही जवळजवळ निश्चित होते. पण, आता बातम्यांनुसार शेवटच्या क्षणी लग्नाचे ठिकाण बदलण्यात आले आहे.

समोर आली लग्नप्रत्रिका
खरं तर, याआधी नयनतारा आणि विघ्नेश शिवन ९ जूनला आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिरात लग्न करणार असल्याची बातमी आली होती. पण, आता बातमी आहे की, त्यांनी लग्नाचं ठिकाण बदललं आहे. या जोडप्याने तामिळनाडूतील महाबलीपुरम येथील महाब या रिसॉर्टची निवड केल्याचे सांगितले जात आहे. नयनतारा आणि विघ्नेश आपले लग्न साधेपणाने व्हावे, याची विशेष काळजी घेत आहेत. त्यामुळेच त्यांनी लग्नासाठी तिरुपती मंदिराची निवड केली होती. पण, आता यासाठी महाब त्यांच्यासाठी अधिक चांगले ठरेल, असे ते म्हणतात. नयनतारा आणि विघ्नेशच्या लग्नाचे डिजिटल वेडिंग कार्ड समोर आले आहे, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (actress nayanthara and director vignesh shivan change their wedding venue)

चेन्नईत रिसेप्शनची तयारी
लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. तसेच, लग्नानंतर चेन्नईमध्ये एक भव्य रिसेप्शन पार्टी ठेवण्याची योजना आहे, ज्यामध्ये कॉलिवूडची लोकं, इतर मित्र आणि महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित असतील. नयनतारा आणि विघ्नेश गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा