Monday, July 1, 2024

अरुण बाली यांच्या निधनाने पूर्णपणे तुटली नीना गुप्ता; भावूक पाेस्ट चर्चेत

बाॅलिवूडचे दिग्गच अभिनेता अरुण बाली यांच्या निधनाने चाहत्यांनसाेबतच बाॅलिवूडचे स्टारही दु:खी आहेत. अभिनेताच्या निधनानंतर साेशल मीडियावर अभिनेताला श्रद्धांजली देणं सुरु आहे. अभिनेत्याचे चाहते, त्याचा मित्र परिवार आणि काे – स्टार्स अरुण बाली यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत साेशल मीडियावर पाेस्ट करत आहे आणि त्यांच्या कुटुंबाच सांत्वन  करत आहेत.

अलिकडेच, अरुण बाली(Arun Bali) यांना ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अमिताभ बच्चनचा ‘गुडबाय’ (Goodbye) या चित्रपटात बघितले हाेते. आता त्यांची गुडबाय को-स्टार नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी टीव्ही मालिका ‘परंपरा’च्या सेटवरील त्यांच्यासाेबत असलेले थ्रोबॅक फाेटाे शेअर करत दिेवंगत अभिनेताला श्रद्धांजली देत आहे.

अभिनेता अरुण बाली 79 वर्षाचे हाेते. त्यांनी आज ( दि. 7 ऑक्टोबर 2022)ला अखेरचा श्वास घेतला. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांचे मुंबईत निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचेही सांगितले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, त्यांना एक दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर रोग असल्याचे कळले होते, ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘परंपरा’च्या शूटिंगचा पहिल्या दिवसाचा फाेटाे
नीना गुप्ताने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अरुण बालीसाेबतचा खूप वर्ष जुना फाेटाे शेअर केला आहे. इंस्टाग्राम वर या फाेटाेला शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये खुलासा केला की, हा फाेटाे 1993मध्ये प्रसारित झालेली प्रसिद्ध मालिका ‘परंपरा’च्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. या शाेमध्ये अनिल धवन, मोहन भंडारी, ऋचा, फिरदौस दादी, अश्विनी भावे आणि प्रभा सिन्हाने देखील अभिनय केला हाेता. फाेटाेमध्ये अरुण बाली हे नारंगी रंगाच्या आउटफिटमध्ये एका संन्यासीच्या भूमिकेत दिसत आहे, तर नीना गुप्ता त्याच्या शेजारी बसलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

फाेटाे शेअर करत नीना गुप्ताने लिहिले की, ”गुडबाय #ArunBali …काही वर्षांपूर्वी अरुण बालीसोबतच्या ‘परंपरा’ मालिकेसाठी शूटिंगचा पहिला दिवस. नुकतेच गुडबायसाठी साेबत शूट करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे.”

अरुण बाली यांची कारकीर्द
अभिनेता अरुण बाली यांनी छाेट्या पडद्यापासून ते रुपेरी पडद्यापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘चाणक्य’, ‘कुमकुम’, ‘स्वाभिमान’ या आहेत. याशिवाय जर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘ओह माय गॉड’, ‘पानिपत’, ‘मनमर्जियां’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’, ‘पीके’ आणि ‘बर्फी’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखच्या बाजूला असलेला चिमुकला आहे तरी काेण? पठ्याने सलमान अन् रणबीरच्या ताेंडातला हिसकावलाय घास
उचलली जीभ लावली टाळ्याला! सैफचा माेठा खुलासा; म्हणाला, ‘ऋतिकसाेबत काम करणं खराब…’

हे देखील वाचा