Saturday, April 20, 2024

दिवंगत अभिनेते अरुण बालींचा जुना व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

हिंदा सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते अरुण बाली यांचे शुक्रवारी (दि. 7 ऑक्टोबर) निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसोबतच संपूर्ण कलाविश्व दु:खात आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनावर चाहते आणि कलाकार शोक व्यक्त करत आहेत. अशातच त्यांचा सोशल मीडियावर थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दिवंगत अभिनेते अरुण बाली (Actor Arun Bali) यांचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते कलाकार आणि त्याच्या आयुष्यावर बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओत ते एकदम साध्या स्थितीत बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसत आहे. मात्र, त्यांचा आवाज अजूनही एकदम ठणठणीत असल्याचे दिसते. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूपच भावूक झाले आहेत.

हा व्हिडिओ असीमा भट्ट या नावाच्या युट्यूब अकाऊंटवर 18 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या व्हिडिओत अरुण बेधडक अंदाजात आपले मत मांडताना दिसत आहेत. या व्हिडिओत असीमा नावाची युट्यूबर अरुण यांच्या असभ्य वर्तनाबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला जेव्हा असीमा विचारते की, तुम्हाला माझे नाव माहिती आहे का? यावर उत्तर देत ते म्हणतात की, “होय, लोक मला सांगतात की, खूपच चांगली कलाकार आहे, पण असभ्य आहे.”

कोण आहे असभ्य?
या व्हिडिओत असीमा म्हणते की, कोण असभ्य नाहीये. यावर अरुण म्हणतात की, “ही तुझ्या बोलण्याची पद्धत आहे.” खरं तर, कोणता कलाकार असा आहे, जो असभ्य नाहीये. यावर ते एक किस्सा सांगतात. ते सांगतात की, ते एक ओपेरा ‘चित्रलेखा’ करत होते. यामध्ये एडिटिंगदरम्यान अभिनेत्रीचे डायलॉग कट केले नाहीत, पण माझे करण्यात आले. त्यावेली मी मजेत म्हणालो होतो की, ही अजूनही असभ्य आहे.” त्यांचे असे म्हणणे होते की, कलाकारांचे हळवे असणे चुकीचे नाहीये.

या व्हिडिओत अरुण यांनी असेही म्हटले की, “नावाने काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला जे नशीबात लिहिलंय, ते मिळतं.” या संपूर्ण व्हिडिओदरम्यान अरुण हसऱ्या चेहऱ्याने बोलताना दिसले. अरुण यांच्या निधनावर चाहते खूपच दु:खी झाले आहेत. एका चाहत्याने भावूक होऊन कमेंट करत त्यांच्या या जुन्या व्हिडिओवर निधनाची माहिती दिली. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, “त्यांचे 7 ऑक्टोबर, 2022 रोजी निधन झाले. खूप मोठे नुकसान झाले.”

अरुण बाली यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ या सिनेमात झळकले होते. त्यासोबतच त्यांनी ‘लाल सिंग चड्ढा’, ‘3 इडियट्स’, ‘पीके’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन अमृतसर’ यांसारख्या सिनेमातही काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘डीडीएलजे’ सारख्या चित्रपटात काम करणारे अनुपम खेर यांचीही लव्हस्टोरी होती जरा हटकेच…
आपल्या अशा वक्तव्यामुळे ‘या’कलाकारांनाही करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, एकदा पहाच यादी

हे देखील वाचा