Wednesday, March 29, 2023

उचलली जीभ लावली टाळ्याला! सैफचा माेठा खुलासा; म्हणाला, ‘ऋतिकसाेबत काम करणं खराब…’

बाॅलिवूडतचे प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आणि सैफ अली खान गेल्या दाेन वर्षानंतर ‘विक्रम वेधा‘ या चित्रपटात दिसले. शेवटची त्या दाेघांची जाेडी ‘ना तुम जानाे ना हम’ या चित्रपटात दिसली हाेती. जवळपास 20 वर्षांनंतर या दोन्ही कलाकारांनी ‘विक्रम वेध’साठी एकत्र काम केले आहे. बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाच्या स्टाेरी व्यतिरिक्त या दाेघांची जाेडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशातच ऋतिक साेबत काम करण्याचा सैफचा अनुभव कसा हाेता यावर त्यांनी माेठा खुलासा केला आहे. 

सैफने शेअर केला ऋतिकसाेबत काम करण्याचा अनुभव
‘विक्रम वेधा'(Vikram Vedha) या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) पाेलिसाच्या भूमिकेत आहे. जे की, ऋतिक(Hrithik Roshan) गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. पण ऋतिकने सैफला केवळ रील लाईफमध्येच नाही, तर खऱ्या आयुष्यातही त्रास दिला. एका मुलाखतीत सैफने खुलासा केला की, “ऋतिक साेबत काम करणे माझ्यासाठी फार अवघड हाेते.” सैफने सांगितले की, “ऋतिकसाेबत काम करण्यासाठी मी स्वत:ला मानसिकरित्या तयार केले जणेकरून मला ऋतिक समाेर चांगला परफाॅर्म करता येईल. ऋतिकचे स्क्रीन प्रेझेन्स असे काही आहे की, तो प्रत्येक पात्रात उत्तमरित्या बसतो त्यामुळे ऋतिकसमोर स्वत:ला सिद्ध करणे मला आव्हानात्मक होते.”

ऋतिकसोबत काम करणे हाेऊ शकते वाईट
ऋतिकच्या अभिनय काैशल्याची प्रशंसा करण्यासाेबतच सैफने अनेक गाेष्टींचा खुलासा केला. ताे म्हणाला, “मला असा रिव्यू मिळत आहे की, मी ऋतिकसाेबत काम करायला नकाे. कराण, यामुळे माझे करीअर संपु शकते.” सैफने त्या सर्व लाेकांचे आभार मानले ज्यांनी त्याला हे गाेष्ट म्हणटली आहे. त्याचसाेबत सैफने हे देखील सांगितले की, “जर त्याला ‘वेधा’ची भूमिका मिळाली असती, तर ती थाेड्या वेगळ्या स्वरुपात असती.”

विक्रम वेधा 30 सप्टेंबर राेजी रिलीज झाला हाेता आणि आतापर्यंत या चित्रपटाने 58 काेटीहून अधिक कमाई केली आहे. ऋतिक-सैफचा हा चित्रपट तमिल चित्रपटाचा रिेमेक आहे. मूळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपति मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वेस्टर्न लूकमध्ये मौनीच्या हटके अदा, पाहून तुम्हीही व्हाल फिदा

दिवंगत अभिनेते अरुण बालींचा जुना व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

हे देखील वाचा