पावसात लहान मुलांप्रमाणे निया शर्माने मारल्या उड्या; गच्चीवर भिजत लावले ठुमके


सध्या संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. सगळेजण पावसाचा आनंद घेत आहे. अनेकजण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला देखील जात आहेत आणि पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे. अशातच आपल्या जबरदस्त फॅशन सेन्सने सर्वांना घायाळ करणारी टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्माचा पावसाचा आनंद घेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Actress Nia Sharma dancing in rain, video get viral)

निया शर्माने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती लहान मुलांप्रमाणे उड्या मारत पावसात भिजताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाचे ट्राऊझर घातले आहे. ती गच्चीवर पावसात भिजत डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत आहे आणि यातून रील तयार करत आहे.”

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिचे चाहते देखील सातत्याने या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत. निया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या बोल्ड फोटोमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते.

निया शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘काली: एक अग्नी परीक्षा’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. स्टार प्लसवरील ‘एक हजारो मे मेरी बहना है’ या मालिकेत तिने काम केले. त्यानंतर तिने ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावा’, ‘नागीण’ आणि ‘खतरों के खिलाडी 8’ यामध्ये काम केले आहे. तसेच तिने विक्रम भट्ट यांच्या ‘ट्विस्टेड’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.