‘ड्रीम में एन्ट्री’ गाण्यावर ‘शालू’चा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ


‘फँड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. का नाही आठवणार? शेवटी तुम्हाला देखील तिच्या प्रितीचा विंचू चावलाच असेल ना? आता आलं ना ध्यानात!! आपण बोलत आहोत सर्वांच्या लाडक्या शालूबद्दल. अत्यंत साधीभोळी, दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच हॉट आणि ग्लॅमरस आहे. तिच्या चित्रपटापेक्षा सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरूनच खूपच चर्चेत असते. आता देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Actress Rajeshwari kharat’s new video viral on social media)

राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘ड्रीम मैं एंट्री’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “जी भर के करे रोमान्स.” तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमधील तिच्या दिलकश अदा आणि बोल्ड अंदाज पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणेच तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. चाहते कमेंट करून या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो, तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला नेहमीच राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.

राजेश्वरीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागनाथ मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले होते. मात्र, तिला ‘फँड्री’ चित्रपटासारखे यश मिळाले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.