प्रेग्नंसीदरम्यान झाले होते १५० किलो वजन, अभिनेत्री समीरा रेड्डीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क


बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री समीरा रेड्डी ही तिच्या फिटनेसची खूप काळजी घेत असते. अनेकवेळा ती तिच्या वाढत्या वजनामुळे लाईमलाईटमध्ये असते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, पहिल्या प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजन 105 किलो झाले होते. तिला एलोपेसिया एरियाटा हा आजार झाला होता. त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु त्यानंतर तिने हळूहळू आत्मविश्वासने तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अनेक दिवसांपासून ती तिच्या फिटनेसवर काम करत आहे. नुकतेच तिने सात किलो वजन कमी केले आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना या मागील सिक्रेट सांगितले आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने सांगितले आहे की, योग्य डाएटशिवाय कोणत्याही प्रकारचे इमोशनल इटिंग किंवा स्कॅनिंग करू नका. हेल्थी डाएटकडे लक्ष द्या. (Sameera Reddy share a video on Instagram of her transformation and weight loss secret)

समीरा रेड्डीने सात किलो वजन कमी केले आहे. समीराने व्हिडिओ शेअर करून लिहिले की, “फिटनेससाठी प्रत्येक शुक्रवार मला प्रेरणा देतो. हे लोकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. अशी आशा करते की, मी तुम्हा सर्वांना देखील प्रेरणा देत असेल. मी नेहमीच पोर्शन कंट्रोलवर विश्वास ठेवते. इमोशनली काहीही खात-पित नाही आणि स्कॅनिंगपासून देखील दूर राहते. आई झाल्यानंतर तुम्ही अगदी दमून गेलेल्या असता, तुमच्यात आळस येतो. अनेकवेळा जेवणाकडे दुर्लक्ष होते, तेव्हा तुम्ही स्कॅनिंग करता, पण स्कॅनिंगपासून दूर रहा.”

काही दिवसांपूर्वी समीरा रेड्डीने तिचा एक व्हिडिओ शेअर करून सांगितले होते की, तिचे किती ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. हे सगळे तिने योगा आणि आठवड्यातून चार वेळा बॅडमिंटन खेळून केले आहे. लग्नानंतर समीरा रेड्डीचे आयुष्य खूप बदलले होते. फिट बॉडी आणि अभिनयामुळे सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीने पहिल्या मुलानंतरच चित्रपटसृष्टी सोडून दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.