Monday, April 21, 2025
Home अन्य ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल

‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल

अभिनेत्री मोठ्या पडद्यावरील असो किंवा छोट्या पडद्यावरील, त्या सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत  नेहमीच आघाडीवर असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे निया शर्मा होय. निया नेहमीच आपले बोल्ड फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याव्यतिरिक्त ती आपल्या बेधडक वक्तव्यासाठीही ओळखली जाते. ती खूपच स्टायलिश आहे, याचा प्रत्यत आपल्याला तिची सोशल मीडिया प्रोफाईल पाहिल्यावर येईल. नेटकरी नेहमीच तिला ट्रोल करत असतात. मात्र, याचा फरक पडेल ती निया शर्मा कसली? नुकतेच तिने पॅपराजींसमोर बिंधास्त पोझ दिले. यावरूनही तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

नियाचे ट्रोल होणे, ही आजकाल काही नवीन बाब नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असते. असे असले तरीही, ती ट्रोलर्सला आपल्या अंदाजात प्रत्युत्तर देत असते. तिला अधिकतर निगेटिव्ह कमेंट्सने कोणताही फरकत पडत नाही. नुकताच पॅपराजींसमोर पोझ देतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती फोटोग्राफर्स ज्याप्रकारे सांगतील, तसे पोझ देत आहे. (Actress Nia Sharma Trolled For Posing Infront of Paparazzi)

नेटकऱ्यांनी केले ट्रोल
व्हिडिओत नियाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केल्याचे दिसत आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. पोझ देताना नियाचे एक्सप्रेशन्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हायरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ओव्हर ऍक्टिंगचे दुकान” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “खूपच ऍटिट्यूड आहे या पोरीमध्ये.” आणखी एका युजरने लिहिले की, “स्वत:ला सुपर मॉडेल समजते. फालतूपणा.”

एकीकडे ट्रोल होत असली, तरीही दुसरीकडे तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने लिहिले की, “एक हजारात माझी बहीण आहे. जमाई राजा माझी आवडती मालिका होती निया.”

देवोलीनाशी भांडण झाल्याच्या होत्या चर्चा
निया शर्मा बेधडकपणे सोशल मीडियावरील प्रश्नांना उत्तरे देत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या डान्सची थट्टा उडवल्यामुळे चर्चेत होती. यावर देवोलीनानेही खणखणीत प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आपली चूक समजल्यानंतर दोघींनीही एकमेकींची माफी मागितली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची

-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज

हे देखील वाचा