‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज


आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. तसे पाहिले तर, रोजच आपण त्यांच्याप्रती आपले प्रेम आणि कृतज्ञता जाहीर केली तरी कमी आहे. मात्र आज फादर्स डेच्या निमित्ताने आपण त्यांच्याबद्दल आपले प्रेम, आदर व्यक्त करतो. सामान्य लोकांसोबतच कलाकार देखील हा दिवस आज साजरा करत आहे. ते सोशल मीडियावर वडिलांसोबतचे फोटो आठवणी पोस्ट करत त्यांचे वडिलांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत.

टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीची नायिका असलेल्या जॅस्मिन भसीनने देखील हा दिवस साजरा करण्यासाठी खास तयारी केली आहे. जॅस्मिनने ‘फादर्स डे’च्या औचित्याने तिच्या आई वडिलांसाठी खास भेट ठरवली आहे. आता हे वाचल्यावर तुम्हाला वाटेल की, जॅस्मिन अली गोनीसोबत लग्न करते की काय. नाही नाही, ही ती भेट नाही. तर कोटामध्ये राहत असलेल्या तिच्या आई वडिलांना ती लवकरच मुंबईमध्ये घेऊन येणार आहे.

याबद्दल तिने सांगितले की, “मागच्या अनेक दिवसांपासून मी माझ्या आई वडिलांना मुंबईला शिफ्ट होण्यासाठी
सांगत आहे. कोरोनाआधी माझे आईवडील नेहमी मला भेटायला, माझ्याजवळ राहायला यायचे. मात्र कोरोनाने त्यांचे येणे जाणे बंद झाले. यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे माझी आई देखील सापडली होती. आई पॉजिटिव्ह झाल्यानंतर माझ्या वडिलांनी आईला बेड मिळावा यासाठी प्रचंड वणवण केली आणि मी इकडे असल्यामुळे स्वतः ला असहाय्य समजत होते. अखेर अथक प्रयत्नांनंतर त्यांना आईसाठी बेड मिळाला.” (jasmin bhasin buy a house in mumbai for their parents)

पुढे ती म्हणाली, “या घटनेमुळे मी खूप घाबरली आणि माझ्या आई वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले, की आता मला तुमच्यासोबत, तुमच्या आसपास राहायचे. पुन्हा मला असा कोणताच भयानक आणि भीतीदायक अनुभव घ्यायचा नाही. म्हणून आता आपण सोबत राहूया. ते देखील तयार झाल्याने मी आता नवीन घराच्या शोधात आहे. जिथे आम्ही सर्व एकत्र राहू शकतो.”

आई वडिलांच्या पाठिंब्याबद्दल सांगताना म्हणाली, “मला आयुष्यात माझ्या प्रत्येक निर्णयात त्यांनी पाठिंबा दिला. खासकरून माझ्या वडिलांनी मला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर साथ दिली. जेव्हा मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा सुद्धा त्यांनी मला मुंबईमध्ये राहताना कोणत्या गोष्टींशी कसा सामना करायचा हे शिकवले. आज ते माझ्याजवळ राहायला आले, की माझी ताकद अधिक वाढेल. माझ्या वडिलांनी मला नेहमीच प्रामाणिक, इमानदार आणि मनापासून काम करण्याची शिकवण दिली. मी आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच.”

बिग बॉसमध्ये भेट झाल्यानंतर जॅस्मिन आणि अली गोनी हे आता नात्यात आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या मीडियामध्ये येतच असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोशल मीडियावर व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा नवा लूक; तर चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘अक्षय कुमारला मीच स्टार बनवले, नाहीतर तो…’ लाईव्ह सेशनमध्ये गायक अभिजित भट्टाचार्य यांचा मोठा दावा

-ऐश्वर्याला अशाप्रकारे मिळाली होती ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील नंदिनीची भूमिका; दिग्दर्शकाने केला होता खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.