‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची


श्रुती मराठे ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र या दिवसांत ती चित्रपटांपेक्षा, तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे खूप चर्चेत असते. एका पेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाही. तिचा चाहतावर्ग देखील भलामोठा आहे. म्हणूनच तिचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सतत तिचे नवनवीन फोटोशूट समोर येत असतात. तिचा दिलखेचक अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.

आता नुकताच श्रुतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने तिच्या आगामी फोटोशूटची झलक चाहत्यांसमोर सादर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अतिशय स्टाईलमध्ये पोझ देताना दिसली आहे. यामध्ये तिने लाल रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला आहे आणि त्याखाली पिवळ्या रंगाची पँट घातली आहे. यात अभिनेत्री बऱ्यापैकी ग्लॅमरस दिसत आहे. असा ग्लॅमरस लूक करून श्रुती फोटोसाठी पोझ देत आहे.

श्रुती मराठेने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “फोटो लवकरच येतील.” हा व्हिडिओ सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणेच तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. शिवाय चाहते आता श्रुतीच्या या नव्या फोटोशूटची उत्सुकतेने वाट पाहत असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (shruti marathe shared her glamorous video and said photos coming soon)

श्रुती अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. श्रुतीने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच, ती सोशल मीडिया पोस्टनेही प्रेक्षकांना प्रभावित करते. दरदिवशी तिचे फोटो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.