Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘माझी आवडती डान्स फॅमिली’, म्हणत नोरा फतेहीने शेअर केला फॅमिली डान्स व्हिडिओ

‘माझी आवडती डान्स फॅमिली’, म्हणत नोरा फतेहीने शेअर केला फॅमिली डान्स व्हिडिओ

बॉलीवूडची सुपर डान्सर म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही केवळ बॉलीवूडसोबतच ती मीडिया सेन्सेशन देखील आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. अलीकडेच नोराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्टीव्ह डान्स चॅलेंजप्रमाणे डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत आणखी दोन सुंदर व्यक्ती दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये नोरा गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून, या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत दुबईत राहणारे कुटुंबीय दिसत आहे. हा व्हिडिओ पाहणारे युजर्स म्हणत आहेत की, ‘संपूर्ण कुटुंब उत्तम डान्सर्स भरलेले आहे.’ खरं तर, नोरा सध्या दुबईमध्ये तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याचवेळी नोरा आणि तिचे कुटुंब स्टीव्हस डान्स चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहे.

या व्हिडीओचे खास वैशिष्ट्य म्हणजे नोराचा व्हिडीओ चाहत्यांना आवडत तर आहेसच सोबतच तिच्या सोबत डान्स करणाऱ्या मुलीचा डान्सही सर्वांना आवडत आहे. नोरा ज्या उत्साहाने डान्स करतेय तोच तोच उत्साह तिच्यासोबत नाचणाऱ्या मुलीने कायम ठेवला आहे. ही मुलगी देखील नोरासारखी उत्तम डान्सर बनेल असा विश्वास यूजर्सला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहते प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद देत आहेत.

दुसरीकडे, नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. अलीकडेच ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली आतापर्यंतची सर्व गाणी सुपरहिट होत असतात. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा