नोरा फतेहीच्या बोल्ड ड्रेसने केली कॅमेऱ्यासमोरच पंचायत, ‘अशा’प्रकारे सांभाळला खाली घसरत चाललेला ड्रेस

एखाद्या कार्यक्रमाला किंवा पुरस्कार सोहळ्याला जाताना आपण कोणते कपडे परिधान केले पाहिजेत, याची कलाकार काळजी घेत असतात. कारण, त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांसमोर आपले सादरीकरणही करावे लागते. मात्र, अनेकदा हे कलाकार विशेषत: अभिनेत्री अशा ड्रेसची निवड करतात, जे पाहून पाहणाराही विचारात पडल्याशिवाय राहत नाही. या अशा ड्रेसमुळे स्वत:ला वेगळे दाखवण्याच्या नादात अभिनेत्री इतका बोल्ड ड्रेस परिधान करतात की, तो सांभाळताना त्यांच्या नाकी नऊ येते. असेच काहीसे घडले ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसोबत. नोरा एका पुरस्कार सोहळ्यात बोल्ड ड्रेस परिधान करून पोहोचली होती. मात्र, तिचा ड्रेस हळूहळू खाली घसरू लागला, तेव्हा ती थेट मीडियासमोरच आपला ड्रेस सांभाळू लागली. यादरम्यानच ती ऊप्स मोमेंटची शिकार होता होता वाचली. दरम्यानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सन २०१८ चा आहे हा किस्सा
नोरासोबत ड्रेसचा हा किस्सा सन २०१८ मध्ये घडला होता. ती ‘लक्स गोल्डन रोज अवॉर्ड’ सोहळ्यात गेली होती. या पुरस्कार सोहळ्यात नोरा नेहमीप्रमाणे बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली होती. ज्यावेळी ती ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून कार्पेटवर पोहोचली, तेव्हा तेथील सर्व कॅमेरे तिच्याकडेच फिरले.

परिधान केला होता ऑफ शोल्डर ड्रेस
या पुरस्कार सोहळ्यात नोरा फतेही (Nora Fatehi) क्रीम रंगाचा ऑफ शोल्डर अतिशय टाईट गाऊन घालून पोहोचली होती. या ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत होती. हा ड्रेस परिधान करून नोरा मीडियाशी संवाद साधण्यासाठी रेड कार्पेटवर येताच ती अनेकवेळा तिचा ड्रेस सांभाळताना दिसली. खाली घसरत असलेला ड्रेस ती सतत वर सरकवतानाही दिसली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नोराला पाहून हे स्पष्ट होते की, अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच अस्वस्थ आहे.

ड्रेस सांभाळत दिले पोझ
व्हिडिओमध्ये दिसते की, नोराला हा ड्रेस सांभाळणे कठीण जात आहे. तरीही अभिनेत्रीने हा ड्रेस कसातरी सांभाळला आणि रेड कार्पेटवर जोरदार पोझ दिली. नोराच्या या व्हिडिओची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. मात्र, अशाप्रकारे ड्रेस सांभाळताना अभिनेत्रीची ऊप्स मोमेंटची शिकार होण्यापासून थोडक्यात वाचली. याआधीही नोरा अनेकदा तिच्या ड्रेसमुळे ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे.

नोराच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकली होती.

हेही वाचा-

Latest Post