पावसात साडी नेसून निघाली नोरा फतेही; ट्रोल करत नेटकरी म्हणाले, ‘ही अशी का चालतेय?’


आपला देश सोडून परदेशात जाणे आणि तिथे आपल्या प्रतिभेने डंका वाजवणे वाटते तितके सोपे नाही. मात्र, हे सुद्धा यशस्वी करून दाखवणारे कलाकार आज आपल्याला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. त्यातीलच एक आपल्या सर्वांच्या परिचयाचे नाव म्हणजे नोरा फतेही होय. नोरा ही एक डान्सर, अभिनेत्री, गायिका, प्रोड्यूसर आणि मॉडेल आहे. यासर्वांमध्ये तिने आपल्या डान्स आणि अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याव्यतिरिक्त तिचा सोशल मीडियावरही भला मोठा वावर आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यात ती बऱ्याच वेळा पाश्चिमात्य पोशाखात दिसत असते. मात्र, नुकतीच ती गुलाबी साडीत दिसली. तिचा हा व्हिडिओ आता जबरदस्त व्हायरल होत आहे.

नोरा गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिचे यादरम्यानचे व्हिडिओ पॅपराजींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर झळकताना दिसत आहे. नोराचे चाहते तिची प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे काही युजर्स तिला ट्रोलही करत आहेत. तिच्या चालण्यावर नेटकरी कमेंट्स करत आहेत. (Actress Nora Fatehi Walks In Saari People Trolled Her For Walk)

नोराच्या चालण्यावर केले ट्रोल, चाहते म्हणाले मोहक
नोरा सोमवारी (१९ जुलै) फिल्मिस्तानमध्ये शूटिंग करण्यासाठी पोहोचली होती. पावसादरम्यान गुलाबी साडीत नोरा खूपच सुंदर दिसत होती. तिचा व्हिडिओ व्हायरल होताच, काही लोकांनी तिला मास्कवर, तर काहींनी चालण्यावर ट्रोल केले. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, “ही अशी का चालत आहे यार? सामान्यपणे चालता येऊ शकते.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हिला सामान्यपणे चालता येत नाही?”

दुसरीकडे तिच्या चाहत्याने लिहिले की, “मला माहिती आहे की, तुम्ही तिच्या चालण्यावर हसत आहात, पण जरा लक्ष द्या की, ती किती मोहक दिसत आहे.”

‘भुज’ चित्रपटात ऍक्शन सीन करणार नोरा
नोराच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकरही दिसणार आहे. हा चित्रपट सन १९७१ मध्ये भारत- पाकिस्तानात झालेल्या युद्धावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नोरानेही सांगितले आहे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या सहअभिनेत्याच्या हातातून बंदूक सटकल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर लागली होती. नोराच्या माथ्यावर दुखापतही झाली होती. तसेच रक्तही निघाले होते. नोराला रुग्णालयातही जावे लागले होते.

नोराच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने सन २०१४ साली ‘रोर: टायगर ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत अनेक आयटम साँग्स दिले आहेत. त्यामध्ये ‘दिलबर दिलबर’, ‘ओ साकी’, ‘पछताओगे’, ‘एक तो कम जिंदगाणी’, ‘छोड देंगे’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.