Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड न्यायालयाचा मोठा निर्णय! नुसरत जहाँ अन् निखिल जैनचे लग्न ठरवले कायदेशीररीत्या अवैध

न्यायालयाचा मोठा निर्णय! नुसरत जहाँ अन् निखिल जैनचे लग्न ठरवले कायदेशीररीत्या अवैध

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ गेल्या काही काळापासून निखिल जैनसोबतच्या लग्नामुळे वादात सापडली आहे. १९ जून, २०१९ रोजी निखिल आणि नुसरतने मोठ्या थाटामाटात लग्न केले. दोघांनीही तुर्कीमध्ये लग्न केले आणि तुर्की विवाह नियमांच्या आधारे केले गेले. त्याआधारे नुसरतने निखिलपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज करण्यास नकार दिला. तुर्कस्तानचा कायदा भारतात वैध नाही, त्यामुळे तिच्या लग्नालाही येथे मान्यता नाही, असे नुसरतचे म्हणणे आहे.

कोलकाता न्यायालयाने सांगितले की, विवाह कायदेशीररीत्या नाही वैध
कोलकाता न्यायालयाने आता नुसरत आणि निखिल जैन यांचे पहिले लग्न कायदेशीररीत्या अवैध ठरवले आहे. नुसरतचा दृष्टिकोन योग्य मानून न्यायालयाने दिलेल्या आदेशात नुसरत मुस्लिम आणि निखिल जैन श्रद्धेच्या आधारावर हिंदू असल्याचे म्हटले होते. कोलकाता न्यायालयाने सांगितले की, नुसरत आणि निखिल जैन यांचे विशेष विवाह कायद्यानुसार लग्न झालेले नाही.

नुसरत जहाँने तिच्या लग्नावर सोडले मौन
निखिल जैनसोबतच्या लग्नावरून झालेल्या वादावर नुसरतने माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली होती. नुसरत म्हणाली की, “त्याने या लग्नासाठी पैसेही दिले नव्हते. हॉटेलचे बिलही भरले नव्हते. मला त्याला काहीही सांगण्याची गरज नाही. मी प्रामाणिक आहे. माझी चूक आहे. हे दाखवण्यात आले आणि आता मी ते स्पष्ट केले आहे.” कोणाचेही नाव न घेता ती म्हणाली की, “इतरांना दोष देणे सोपे आहे आणि मी कोणालाही वाईट मार्ग दाखवला नाही.”

नुसरतने निखिलवर केला होता फसवणुकीचा आरोप
नुसरत निखिल जैनसोबतच्या लग्नाला नकार दिल्याने ती चर्चेत आली होती. लग्नाच्या वादामुळे दोघेही काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या दोघांच्या नात्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यानंतर नुसरतने निखिलसोबतचे लग्न अवैध असल्याचे सांगत निखिलवर पैशांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता, तर तिथे निखिलने नुसरतच्या वागण्यावरही प्रश्न उपस्थित केले.

यशदास गुप्तासोबतचे नाते दिवाळीत केले अधिकृत
नुसरत बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबतच्या तिच्या नात्यामुळे आणि निखिल जैनसोबतच्या लग्नाच्या वादामुळे सतत चर्चेत होती. नुसरतने दिवाळीच्या खास मुहूर्तावर यशदास गुप्तासोबत तिचे नाते अधिकृत केले. नुसरतने दिवाळीच्या मुहूर्तावर पती यश आणि मुलगा इशानसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच नुसरतच्या भांगेत कुंकू दिसले.

गर्भधारणेबाबतही उपस्थित केले गेले प्रश्न
वैवाहिक वादातून नुसरत प्रेग्नंट राहिल्याने हा वाद वाढला. नुसरतने तिच्या प्रेग्नंसीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीवर प्रतिक्रिया देताना निखिलने सांगितले होते की, गेल्या वर्षी डिसेंबरपासून नुसरत तिच्या आई-वडिलांच्या घरी राहत आहे. त्यामुळे हे मूल कोणाचे आहे, हे त्याला माहिती नाही. नुसरतने या वर्षी ऑगस्टमध्ये मुलाला जन्म दिला होता. नुसरतने चाहत्यांना इशारा करत सांगितले की, तिने यशदास गुप्तासोबत लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक

-‘रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा’, अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी

-लग्नाच्या बातम्यांमध्ये तारा सुतारियाचे फोटोशूट, कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही बॉयफ्रेंड आदर जैन

हे देखील वाचा