‘रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा’, अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी


अनुपम खेर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून समस्त प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतो. याव्यितिरिक्त अभिनयासोबतच अनुपम खेर एक असे अभिनेते आहेत, जे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. तसेच, त्यांचे विचार मांडत असतात. ते नेहमीच त्यांच्या आईसोबतचा संवाद सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांची एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ते चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक खास विचार शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांचे अनेक चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. (Bollywood actor Anupam Kher share post on Instagram user gave such reaction)

अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “जिथपर्यंत रस्ता दिसतोय, तिथपर्यंत चालत राहा. पुढचा रस्ता तिथे पोहोचल्यावर नक्की दिसेल.” हे शेअर करून त्यांनी हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. युजर त्यांचे विचार मांडत आहेत.

त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिले आहे की, “ठीक आहे सर. परंतु दिल्लीमध्ये प्रदूषण खूप आहे.” नुपअम खेर यांनी ही पोस्ट शेअर करताना सांगितले होते की, हा केवळ एक सल्ला आहे.

त्यांच्या या सल्ल्यावर युजर त्यांचे वेगवेगळे विचार मांडत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “रस्ता बघून चला नाहीतर हरवून जाल.” त्यांच्या या पोस्टला ३६ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकजण या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पुकार’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; शूटिंगदरम्यान करीनाने अमिताभ यांचे पाय धरून केली होती ‘ही’ विनवणी

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग


Latest Post

error: Content is protected !!