श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक


बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या त्याच्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटात सिद्धार्थने ज्या पद्धतीने ‘कॅप्टन विक्रम बत्रां’ची व्यक्तिरेखा साकारली, त्यामुळे त्याला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडूनही दाद मिळाली. या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला नवी गती दिली आहे. त्याला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.

करण जोहरच्या आगामी चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने नुकतीच लूक टेस्ट दिली. या लूक टेस्टनंतर करणने सिद्धार्थला फायनल केले आहे. भूमिका निश्चित झाल्यानंतर, सिद्धार्थ आणि करण जोहरने एक मोशन पोस्टर आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

करण आणि सिद्धार्थच्या या चित्रपटाचे नाव ‘योद्धा’ आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कोण असेल, हे अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन चित्रपट असेल. धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणारा हा पहिलाच ऍक्शन चित्रपट असेल.

सिद्धार्थने चित्रपटाचे मोशन पोस्ट शेअर केले आहे. हे आकाशातून खाली येणाऱ्या विमानाने सुरू होते. या विमानात एक- दोनच लोक बसले आहेत. विमानाच्या मागील बाजूस सिद्धार्थ हातात बंदूक घेऊन सतर्क स्थितीत दिसतो आणि कॅमेऱ्याचा फोकस त्याच्यावर वाढत आहे. शेवटी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली जाते.

या मोशन पोस्टरसह सिद्धार्थने लिहिले की, “योद्धा सादर करत आहे. धर्मा प्रोडक्शनचा हा पहिला ऍक्शन फ्रँचायझी चित्रपट आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या दोन प्रतिभावान व्यक्तींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.”

सिद्धार्थ दिसणार रेस्क्यू करताना
याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटातील त्याचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. या दोन पोस्टरमध्ये त्याने दोन वेगवेगळे लूक शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये सिद्धार्थ एका व्यक्तीला बंदुकीने टार्गेट करत आहे, तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तो खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी खुणा आहेत. त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये एक विमान उडताना दिसत आहे. निर्मात्यांनी अद्याप त्याची कथा उघड केलेली नाही, पण मोशन पोस्टर पाहिल्यानंतर सिद्धार्थ आर्मी ऑफिसर किंवा एजंटची भूमिका करत असल्याचं दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा’, अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी

-लग्नाच्या बातम्यांमध्ये तारा सुतारियाचे फोटोशूट, कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही बॉयफ्रेंड आदर जैन

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत


Latest Post

error: Content is protected !!