Saturday, November 23, 2024
Home अन्य अखेर जन्मदाखल्यावरून समोर आले नुसरत जहाँच्या बाळाच्या वडिलांचे नाव; ‘हाच’ अभिनेता आहे बाळाचा बाप

अखेर जन्मदाखल्यावरून समोर आले नुसरत जहाँच्या बाळाच्या वडिलांचे नाव; ‘हाच’ अभिनेता आहे बाळाचा बाप

कलाकारांनी आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत कितीही लपवाछपवी केली, तरी एक ना एक दिवस त्यांचं पितळ उघड पडतचं असाच प्रकार घडला आहे नुसरत जहाँ बरोबर. अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँने २६ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या बाळाला जन्म दिला. पती निखिल जैन बरोबर तिने घटस्फोट घेतल्यांनंतर ती गरोदर राहिली होती. त्यामुळे अनेकांनी तिच्या अशा गरोदरपणावर बोट उचलले होते.

तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. परंतु तिने या सर्वांवर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती अखेर बाळाचा जन्म झाल्यानंतर तिला बाळाचे वडील कोण आहे असे विचारण्यात आले. त्यावर तिने असमाधानकार उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, “बाळाच्या वडिलांना माहित आहे, की ते बाळाचे वडील आहेत.” तिच्या गरोदर असण्यावर निखिल जैनने त्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अनेकांनी बाळाचे वडील यश दासगुप्ता असल्याचे अंदाज बांधले होते. आता या सर्व प्रशांचे उत्तरं मिळत, नुसरतच्या बाळाचे वडील कोण हे समोर आले आहे.

तिच्या बाळाचा म्हणजेच ईशानचा जन्म दाखला समोर आला असून, यावर ईशानचे पूर्ण नाव ईशान दासगुप्ता असे लिहिलेले आहेत. त्यामुळे एवढ्या दिवसांपासून सुरु असलेला यश दासगुप्ताच्या नावाचा अंदाज आज अखेर खरा ठरला आहे. आतापर्यंत नुसरतच्या बाळासोबत दबक्या आवाजात यशचे नाव जोडले जात होते, परंतु आता मोकळेपणाने त्याचे नाव घेता येणार आहे. कोलकत्ता निगममधील कागदपत्रांनुसार बाळाच्या वडिलांचे नाव देबाशीष दासगुप्ता लिहिलेले आहे. यशचे ऑफिशल नाव देबाशीष असून, यावरून बाळाचे वडील यशच असल्याचं समोर आलं आहे.

नुसरतचा घटस्फोट होण्याआधीच यश बरोबर तिचे नाव जोडले गेले होते. निखिल आणि तिचा घटस्फोट यशमुळेच झाला असल्याची हिंट निखिलने एका मुलाखतीमध्ये दिली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता की, “साल २०२० मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगनंतरच नुसरतचे वागणे बदलत गेले. तिच्या अशा वागण्याने माझ्या समोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता.” या दरम्यानच यश बरोबर तिचा ‘एसओएस कोलकाता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघे बऱ्याचदा एकत्र दिसले होते.

निखिल आणि नुसरतच्या घटस्फोटावेळी त्या दोघांमध्ये खूप आरोप प्रत्यारोप झाले होते. निखिलने त्यांचे लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे पार पडले असे सांगितले होते. तर, नुसरतने हे लग्न रजिस्टर नसल्याने ते अमान्य केले. यावेळी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये निखिल म्हणाला होता की,”मी अनेक वेळा तिला आपले लग्न रजिस्टर करून घेऊ असे सांगितले होते. पण तिने ते नेहमी काही ना काही कारणावरून टाळले.”

नुसरतचे बाळ जन्माला आले तेव्हा यशनेच ती आई झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्वांना दिली होती. तसेच आता जन्म दाखल्यावर बाळाच्या नावापुढे त्याचे ऑफिशिअल नाव जोडले गेल्याने बाळाचे वडील यशच आहे हे सिद्ध झाले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा