Monday, June 9, 2025
Home अन्य जांभळ्या रंगाची साडी, भांगेत कुंकू लावलेल्या नुसरत जहाँ यांनी पहिल्यांदा दाखवली मुलाची झलक

जांभळ्या रंगाची साडी, भांगेत कुंकू लावलेल्या नुसरत जहाँ यांनी पहिल्यांदा दाखवली मुलाची झलक

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांनी बिझनेसमन निखिल जैनशी लग्न केल्यापासून त्यांचे वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेचा विषय ठरत आहे. आधी लग्न, नंतर घटस्फोट आणि मग नुसरत जहाँच्या आई झाल्याची बातमी आणि त्यानंतर अभिनेता यश दासगुप्तासोबत लग्नाच्या चर्चा. आदी वैयक्तिक कारणामुळे त्या सतत मीडियामध्ये गाजताना दिसत आहे. हा काळ त्यांचयसाठी अजिबात चांगला नव्हता. पण या क्षणी त्यांनी जगाची पर्वा न करता आपला मुलगा आणि यश दासगुप्तासोबत दिवाळी साजरी केली. या खास प्रसंगी पहिल्यांदाच त्यांनी मुलगा ईशानचा फोटो शेअर केला.

नुसरत यांनी दिवाळीच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यावेळी नुसरत यांनी गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेली जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर मॅचिंग कानातले आणि मोकळ्या केसांसह त्या पोज देताना दिसल्या. यावेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांनी त्यांच्या भांगेत कुंकू लावले होते. या करण्यासाठी सुद्धा त्यांचे दिलेली फोटो तुफान व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी यशदासगुप्ताचा वाढदिवस साजरा करत असताना नुसरत यांनी केकचा शेअर केला होता. ज्यात केकवर लिहिलेला मजकूर वाचून त्यांनी लग्न केल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. केकवर लिहिले होते की, सर्वोत्कृष्ट वडील आणि नवरा असे लिहिले होते. त्यामुळे नुसरत यांच्या या दिवाळी फोटोंमध्ये त्यांच्या भांगेत दिसणाऱ्या कुंकामुळे पुन्हा एकदा त्यांनी लग्न केल्याचे सिद्ध झाले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने या छोट्या कुटुंबाविषयी सांगायचे झालं तर नुसरतसोबत ट्विनिंग करताना यशने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईशाननेही त्याच रंगाचा कुर्ता परिधान केला होता. जरी यश आणि नुसरत यांनी अधिकृतरीत्या लग्न केल्याचे मान्य केले नसले, तरी या जोडप्याला पाहून त्यांची केमिस्ट्री कमालीची आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

नुसरत काही दिवसांपूर्वी पती निखिल जैनसोबतच्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या लग्नाच्या मोडल्याचा बातम्यांनी चांगलीच खळबळ उडाली होती. दोघांनी २०१९ मध्ये लग्न केले आणि काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने ते वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा