नुतन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या दमदार अभिनयाने आणि सहज सुंदर अभिनयाने तिने सिने जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आज नुतन आपल्यामध्ये नसली तरी आजही तिच्या चित्रपटांची आणि सौंदर्याची चर्चा होताना दिसत असते. शनिवार (४ जून) अभिनेत्री नुतनचा वाढदिवस, जाणून घेऊया अभिनेत्री नुतनच्या आयुष्यातील एक गाजलेला किस्सा.
हिंदी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यातील काही घटनाही त्यांच्या चित्रपटाच्या कथेला शोभतील अशाच असतात. अशीच एक घटना अभिनेत्री नूतनसोबत (Nutan) ही घडली होती. कारण त्यांनी त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा असणार्या जन्मदात्या आईलाच कोर्टात खेचले होते. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
View this post on Instagram
नूतन ही ६०च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या कसदार अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी त्या काळात सर्वांनाच मोहित केले होते. त्यांच्या अभिनयावर आणि अदांवर प्रेक्षक खूपच फिदा झाले होते. आजही त्यांच्या अनेक चित्रपटांची चर्चा पाहायला मिळते. नूतनने आपल्या अभिनयाने स्वताःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्या चांगल्याच लोकप्रिय होत गेल्या. आपल्या चित्रपटासोबत नूतन खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत होत्या.
समोर आलेल्या बातमीनुसार, नूतन यांच्या यशामध्ये त्यांची आई शोभना समर्थचा मोलाचा वाटा होता. त्यांनीच नूतनला चित्रपटात आणले होते. मात्र पुढे माय लेकीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि नूतनने चक्क आपल्या आईलाच कोर्टात खेचले होते. याबद्दल खुद्द अभिनेत्री नूतनने एका मुलाखतीत माहिती दिली होती.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “हा माझ्यासाठीही खूप कठीण काळ होता. मला माहित होत माझ्यावर खूप टीका होणार आहे. कारण एक मुलगी आपल्या आईला कोर्टात कशी खेचू शकते, याबद्दल लोक संताप व्यक्त करणारच. मात्र मला हे सगळ माझ्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी करावे लागले. याबद्दल पुढे बोलताना नूतन म्हणाल्या की, “माझ्याशी संबधित सर्व लोकांच्या हितासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला.” मात्र हा वादनंतर संपुष्टात येऊन त्यांचे मतभेदही दूर झाले होते. दरम्यान या वादामुळे नुतन आणि तिची आई तब्बल २० वर्ष एकमेकांशी बोलल्या नव्हत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’