Monday, June 24, 2024

स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत लग्न झाल्यापासून माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. स्वराने कोर्ट मॅरेजनंतरचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना चकित केले आहे. एकीकडे स्वरावर लग्नानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे तिला खूप ट्रोल केले जात आहे. खरे तर, स्वरा भास्करला तिच्या जुन्या ट्विटमुळे ट्रोल केले जात आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने फहाद अहमदला तिचा भाऊ म्हटले होते. अशात आता फहाद अहमदने ट्विटवरून ट्रोलचा क्लास घेणे सुरु केले आहे.

खरे तर, स्वरा भास्कर (swara bhasker) हिने काही दिवसांपूर्वी फहाद अहमदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अभिनेत्रीने फहादला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिचा ‘भाऊ’ म्हणून हाक मारली होती. अशा परिस्थितीत जेव्हा दोघांनी लग्नाची घोषणा केली, तेव्हा लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशात आता स्वराचा पती फहाद अहमदने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, त्याच्या या ट्विटनंतर लोकांनी त्याला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

ट्विट करताना फहाद अहमदने लिहिले की, ‘मंडळीने हे मान्य केले आहे की, हिंदू-मुस्लिम भाऊ-बहीण असू शकतात. मग हेही मान्य करा की, पती-पत्नी देखील मस्करी करू शकतात. यानंतर एका युजरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक मौलाना असे म्हणत आहे की, “जर एखादी मुलगी मुस्लिम नसेल आणि तिने धर्मांतर न करता मुस्लिम मुलाशी लग्न केले, तर असा विवाह आमच्या दृष्टीने अवैध आहे.” यावर एका युजरने लिहिले की, ‘मौलानामधील भावाने तुमच्या नात्याला नवीन नाव दिले आहे.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्न केले आहे. मात्र, दोघांचे लग्न पहिल्या दिवसापासूनच वादात सापडले आहे. कारण, फहाद अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. अशा परिस्थितीत एएमयूच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फैजुल हसन यांनी स्वरा आणि फहाद यांना लग्नानंतर विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले, ज्यानंतर विद्यार्थ्यांमधील वाद वाढत आहेत. (bollywood actress swara bhasker husband fahad ahmad reacts to actress viral bhai tweet user troll him )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुशल बद्रिकेने शेअर पोस्ट करत लिहिले, ‘गोष्ट वडील मुलीच्या अतूट नात्याची…’

तर ‘या’ कारणासाठी अनिल कपूर करायचे श्रीदेवी यांना वाकून नमस्कार, स्वतःच केला होता खुलासा

हे देखील वाचा