Friday, June 14, 2024

बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर

बॉलिवूड अभिनेता ‘आयुष्मान खुराना’ हा चित्रपटांंची निवड आणि त्याने साकरलेल्या भुमिकांमुळे ओळखला जातो. त्याची प्रत्येक भूमिका ही वेगळ्या ढंगाची असते. 2012 मध्ये आयुष्मानने रोमँटिक कॉमेडी विक्की डोनरद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या भुमिकेसाठी त्याचे सर्वत्र कौतुक झाले. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनयाबरोबरच आयुष्मानने आपल्या ‘पानी दा रंग’ या गाण्यासह अनेक चित्रपटांसाठी गायले असून त्यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा झाली. पण आता चर्चेचे कारण अस आहे की, युनिसेफ इंडियाच्या वतीने आयुष्मानची राष्ट्रीय सदिष्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे.

सदिष्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) म्हणाला,”युनिसेफ इंडियाच्या (UNICEF India) माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या हक्कासाठी मला प्रयत्न करता येणार आहे. तसेच माझ्या देशातील लहान मुलांसह किशोरवयीन मुलांच्या समस्यादेशील सोडवता येतील. मी युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी वकील म्हणून मुलांसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी मी इंटरनेट, सुरक्षा, सायबर बुलिंग, मानसिक आरोग्य आणि लैंगिक समानता विषयासंदर्भात मी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. आता युनिसेफसोबत एका वेगळ्या नात्याने मी जोडलो गेलो आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.”

आयुष्मान खुरानाची (Ayushmann Khurrana) आता युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो या संस्थेशी जोडला गेला आहे. लहान मुलांवरील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी आणि बालहक्कांसाठी आयुष्मानने युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी वकील म्हणून कामही केलं आहे. ‘जागतिक बाल दिन’, ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’, आंतरराष्ट्रीय बालिका दिन’ या खास दिवशी आयुष्मान युनिसेफ इंडियाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाला आहे.

युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मानने (Ayushmann Khurrana) एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आयुष्मानने लिहिलं आहे की, “राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती केल्याबद्दल युनिसेफ इंडियाचे आभार…मी गेल्या दोन वर्षांपासून युनिसेफशी जोडला गेलो आहे. त्यामुळे त्यांचं काम मी जवळून अनुभवलं आहे. आता देशातील प्रत्येक मुलाच्या हक्कांसाठी मी प्रयत्न करणार आहे”.

प्रियंका चोप्रादेखील आहे सदिच्छा दूत
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ही 15 वर्षांपासून युनिसेफ इंडियासोबत जोडली गेली आहे. यासंस्थेच्या माध्यमातून ती मुलींच्या अडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका 2006 साली या संस्थेसोबत जोडली गेली असली तरी 2016 साली तिची ‘ग्लोबल यूनिसेफ गुडविल एम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (actor-ayushmann-khurrana-appointed-as-national-ambassador-for-unicef-india)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या आईचा व्हिडिओ झाला व्हायरल म्हणाल्या, ‘आजही लोकं माझ्यावर…’

अक्षय कुमारला भेटण्यासाठी चाहत्याने तोडले बॅरिकेडिंग, पुढे असे काही घडले जे पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा