Friday, July 5, 2024

‘भोजपुरी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाने डीप नेक टॉपमध्ये केला कहर

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मोनालिसाने हिंदी चित्रपटापासून भोजपुरी चित्रपटसृष्टीपर्यंत आपले अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. टीव्हीच्या दुनियेतील ती एक चमकता तारा आहे. भोजपुरी सिनेमांव्यतिरिक्त मोनालिसा टीव्हीच्या दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. जेव्हा जेव्हा मोनालिसा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ते व्हायरल होतात. दरम्यान, मोनालिसाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री फ्रिल टॉप परिधान केलेल्या आकर्षक स्टाईलमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये मोनालिसाने डीप नेक फ्रिल टॉप आणि पिवळ्या रंगाची प्लाझो परिधान केली आहे.  या गेटअपमध्ये अभिनेत्री खूपच आकर्षक दिसत आहे. आपल्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मोनालिसाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. मोनालिसाच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री ओइंद्रिला सेनने ‘सेक्सी’ कमेंट केली आहे. मोनालिसाच्या फोटोवर आणखी एका युजरने लिहिले की, “तू भोजपुरीची क्वीन आहेस.” मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते आणि इंस्टावर त्यांच्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

मोनालिसाची हा अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच वेड लावते आणि चाहते देखील तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. मोनालिसाने केवळ भोजपुरीच नाही, तर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोनालिसाने अनेक हिंदी टीव्ही मालिकांमधूनही आपली ज्योत पसरवली आहे.

मोनालिसाचा बोल्ड अवतार अनेकदा व्हायरल होतो. तिने १२५ हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती भोजपुरी सिनेमातील सर्वात जास्त मागणी असलेल्या नायिकांपैकी एक होती. मोनालिसा बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून पोहोचली होती. मोनालिसाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘ब्लॅकमेल’ होता. ज्यामध्ये ती अजय देवगण आणि सुनील शेट्टीसोबत दिसली होती.

हे देखील वाचा