Saturday, January 18, 2025
Home मराठी पूजा सावंतचा व्हिडिओ पाहून, चाहते काय तर कलाकारांचे देखील हरपले भान, करतायेत कौतुकाचा वर्षाव

पूजा सावंतचा व्हिडिओ पाहून, चाहते काय तर कलाकारांचे देखील हरपले भान, करतायेत कौतुकाचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. ज्या त्याच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत. याच यादीतील एक नाव म्हणजे पूजा सावंत. चित्रपटासोबत सध्या पूजाचा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. सातत्याने तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

पूजाने अलीकडेच सोशल मीडियावर तिचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने साऊथ इंडियन लूक केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती या व्हिडिओमध्ये ‘मनिके लागे हिथे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने खूप सुंदर साजशृंगार केला आहे. ज्यामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. (Actress pooja sawant share her dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “हा ट्रेंड फॉलो करायला मला जास्त उशीर नाही झाला.” तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओ त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. यासोबत अनेक कलाकार देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री सोनाली खरे हिने या व्हिडिओवर “सो प्रीटी” अशी कमेंट केली आहे तर अमृता खानविलकर हिने “सुंदरी” अशी कमेंट केली आहे यासोबत आदिनाथ कोठारे याने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा