आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पूनम पांडे हिचाही समावेश होतो. पूनम घरातून बाहेर पडताच तिच्या मागे चाहते आणि पॅपराजींची रांगच लागते. ती सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. त्यावर ती तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. अशात ती पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान तिने आपल्या कातिलाना पोझ आणि बोल्ड अंदाज दाखवला. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही दंग झाले आहेत. पूनमच्या या अंदाजाने अनेकांना घाम फोडला आहे.
पूनम पांडेचा ब्लॅक एँड व्हाईट लूक
व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसते की, पूनमने यादरम्यान आपल्या अदांची जादू सर्वांवर चालवली आहे. ती यावेळी पांढऱ्या रंगाच्या पँट आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टखाली काळ्या रंगाच्या ब्रालेटमध्ये दिसली. तिला पाहताच चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या. कारण, ती खूपच बोल्ड दिसत होती. यावेळी तिने शर्टची सर्व बटणे उघडी ठेवून बोल्डनेसचा तडका लावला होता. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत. यावर चाहत्यांनी कमेंट करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच, अनेक युजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
जेव्हा पूनम पांडे विमानतळावर इतक्या बोल्ड अवतारात पोहोचली, तेव्हा तिला पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. एका युजरने मार्केटमध्ये कपडे बंद करण्याची मागणी केली आहे. त्याने लिहिले की, “लोक कपड्यांविना प्रसिद्ध होत आहेत, तर मार्केटमध्ये कपडे ठेवणेही बंद करा.”
#poonampande is the latest toast of town. Today the shutterbugs spotted her at the airport and the she looked stunning as usual. #poonampandey #actress #bollywood #spotted #hot #sexy pic.twitter.com/oXA2RTKeOK
— Bollywood Ki Baten (@BollyKiBaten) September 29, 2022
सोशल मीडियावर सक्रिय असते पूनम
तसं पाहिलं, तर पूनम पांडेला अशा बोल्ड अंदाजात पाहण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही पूनमचा असा सेक्सी अवतार चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट चाळले, तर पाहणारा प्रत्येकजण हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. पूनम ही इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. महत्त्वाचं म्हणजे, ती अनेकदा तिच्या बोल्डनेससाठी ट्रोल होत असते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ही तर सुवर्णसंधी…’, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल केला मोठा खुलासा
आलिशान आयुष्याला लाथ मारत प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, झोपडीत काढतेय दिवस