Thursday, March 30, 2023

‘ही तर सुवर्णसंधी…’, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल केला मोठा खुलासा

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. याआधीचे बिग बॉसचेही तिनही सीझन तुफान लोकप्रिय ठरले होते. त्यामुळेच कार्यक्रमाच्या पुढील सिझनसाठीही प्रेक्षक चांगलेच आतुर झाले आहेत. यावेळी कार्यक्रमात कोणते कलाकार सहभागी होणार याबद्दलही सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की , शिंदेगटाचे आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) नेहमीच चर्चेत येत असतात. आपल्या राजकारणाव्यतिरिक्त ते त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. सध्या ते पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट मराठी बिग बॉसममध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामध्ये त्यांनी या कार्यक्रमात जाणे माझ्यासाठी सुवर्णसंधी असेल असे मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्हाला बोलावले तर आम्ही नक्की जाऊ. मला अस वाटत की गुलाबराव पाटलाला कोणी बोलावत असेल आणि अशी संधी असेल तर मला मागच्या जन्माची आठवण होते असे सांगत त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत तसेच महाविद्यालयात असताना नाटक किंवा कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी व्हायचो” असे सांगत त्यांनी या कार्यक्रमात येण्याची उघडपणे इच्छा बोलून दाखवली.

दरम्यान ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांना या कार्यक्रमात कोणत्या राजकीय नेत्याला  पाहायला आवडेल असे विचारले असता त्यांनी गुलाबराव पाटील यांचेच नाव घेतले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- आलिशान आयुष्याला लाथ मारत प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, झोपडीत काढतेय दिवस
दाक्षिणात्य सुंदरीचा जलवा! बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’नेही धरला गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल
मातृभूमीचा वाद! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, ‘तुला भारतरत्न द्यायला पाहिजे…’

हे देखील वाचा