प्राजक्ता माळीकडून चाहत्यांना खास भेट! ‘प्राजक्ताप्रभा’ काव्यसंग्रह आलं रसिकांच्या भेटीला


अलीकडेच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने सांगितले होते की, ती चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहे. तिने एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिच्या हातात एक पेन होता आणि ती वहीवर काहीतरी लिहिताना दिसली होती. सोबतच यावर लिहिलं होत की, “प्राजक्ताकडून लवकरच…एक सुंदर भेट.” ही पोस्ट समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

आता तुम्हाला ऐकून आनंद होईल की, अभिनेत्री, सूत्रसंचालक आणि नृत्यांगना म्हणून आपल्यासमोर आलेली प्राजक्ता, आता एक कवयित्री म्हणून रसिकांच्या भेटीला आली आहे. तिचे ‘प्राजक्ताप्रभा’ हे काव्यसंग्रह नुकतेच प्रकाशित झाले आहे. ग्रंथाली प्रकाशित या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार आणि कवी असलेल्या प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री अमृता खानविलकर, पुष्कर जोग आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे उपस्थित होते. शिवाय प्राजक्ताचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीय देखील याठिकाणी तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.

या कार्यक्रमाचे काही फोटो प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलंय की, “प्राजक्तप्रभा…माझा पहिलावहिला काव्यसंग्रह…पहिलाच प्रयत्न. स्वत:ला कवयित्री वगैरे म्हणवून घेणं जड जातय… प्रामाणिकपणे व्यक्त होणं, एवढाच ह्याचा माझ्यासाठीचा अर्थ…” (actress prajakta malis new innings will come audience new form)

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणते की, “कधी कुठेतरी छापून याव्यात किंवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात, यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. हे सर्व योगायोगाने जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच माझ्यासाठीही सुखद धक्का आहे. तसेच या संग्रहातील कविता मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असून साध्या व सोप्या भाषेत आहेत. त्यामुळे त्या वाचकांना आपल्याशा वाटतील आणि आवडतील अशी आशा आहे.” प्राजक्ताचा हा काव्यसंग्रह वाचण्यासाठी चाहते देखील बरेच उत्सुक असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.