काय सांगता! अजय देवगणची ‘सहनायिका’ राम मंदीर उभारणीसाठी देणार इतकी मोठी रक्कम दान!


गेल्यावर्षी २०२० मध्ये कोव्हीड १९ च्या या गोंधळामध्ये देखील गेल्या कित्येक वर्षांचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागला. मागच्या वर्षी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या भव्य मंदिराच्या निर्माणासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता लागणार आहे. म्हणूनच देशभरातील जनतेकडून निधी गोळा करण्यात येणार आहे. अनेकांनी तर निधी द्यायला सुरुवातही केली आहे. तर काहींनी देण्याची घोषणा केली आहे. मग यामध्ये सिनेकलाकार मागे कसे राहतील बरे? दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने निधी दान देण्याची घोषणा केली आहे. प्राणिथा किती निधी दान करणार आहे चला पाहुयात.

अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामासाठी १ लाख रुपयांचा निधी समर्पित करण्याची घोषणा केली आहे. प्रणिता सुभाषने ट्विटरवरुन आपल्या योगदानाची घोषणा केली आणि लिहिले की, ‘मी अयोध्या राम मंदिर निधी समर्पण मोहिमेमध्ये १ लाख रुपये देण्याचं वचन देते. मी आपणा सर्वांना राम मंदिर निधी देण्याच्या या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याची विनंती करते.’ प्रणिता सुभाषचा निर्णय बऱ्याच लोकांना आवडला आहे. तीचं हे आवाहन आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.

आपणा सर्वांना हे ठाऊकच असेल की राम मंदिर निर्मितीसाठी अयोध्येत निधी संकलनाची मोहीम सुरू झाली आहे. हा निधी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र या नावाने देशभरात राबविल्या जाणाऱ्या मोहिमे अंतर्गत एकत्रित केला जाणार आहे. ही मोहीम १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रत्येकजण स्वेच्छेने या मोहिमेत निधी समर्पित करू शकतो. विश्व हिंदु परिषदेने या मोहिमेची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.

अभिनेत्री प्रणिता सुभाष कन्नड, तेलगू आणि तमिळ भाषेच्या चित्रपटांमध्ये तिच्या उत्तम अभिनयासाठी लोकप्रिय आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट ‘पोर्की’ द्वारे तिने पदार्पण केलं. तिचे लोकप्रिय चित्रपट तेलगू आणि तामिळ भाषेत आहेत. अटरिन्टीकी डरेडी, बावा, मासू एंगिरा मसिलामणि आणि एन्कू वाएटी आदिमाइगल सारख्या यशस्वी चित्रपटांत ती आतापर्यंत झळकली आहे.

प्रणिता सुभाष कन्नड चित्रपट ‘राम अवतार’ मध्ये दिसणार आहेत. याशिवाय अजय देवगणच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटातही झळकणार आहे. प्रियदर्शनच्या ‘हंगामा २’ मध्येही ती दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.