आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अश्याच काही सिरीज म्हणजे मिर्झापूर पंचायत, या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जर तुम्ही ‘पंचायत‘ आणि ‘ग्राम चिकित्सालय’ सारख्या मालिका पाहिल्या असतील आणि तुम्हाला तशीच एक उत्कृष्ट मालिका पाहायची असेल, प्राइम व्हिडिओवर ‘मिट्टी – एक नई पहचान’ ही मालिका तुम्ही पाहु शकता.
‘मिट्टी – एक नई पहचान’ साधी सरळ कथा आहे. जी मनाला भावते. या सीरीजचा पहिला सीजन 9 जुलै, 2025 रोजी प्रसारित झाला. ही हिंदी कौटुंबिक ड्रामा मालिका एमएक्स प्लेयरवरही तुम्ही पाहु शकता. तर ही कथा शहरी जीवन आणि ग्रामीण मुळे, शेती आणि कौटुंबिक मूल्ये यांच्यातील संतुलन दर्शवते. हि मालिका कोणत्याही वयोगटातील लोक पाहु शकतात. म्हणजेच या मध्ये कोणतेहि अपशब्ध नसल्याने हि मालिका लहान मुले ही पाहु शकतात.
सुरुवातीला एक छोटीशी भेट वाटणारी ही घटना हळूहळू आयुष्य बदलणाऱ्या प्रवासात बदलते. आजोबांचे कष्ट आणि त्याग पाहून अत्यंत भावूक झालेला राघव, गावातच राहून कर्ज फेडण्याची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतो. अशी जीवणातील वळण कसे बदलतात या सर्वाचा या भाग दाखवला गेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘ड्रॅगन’ ’मधील Jr. NTRचा फर्स्ट लुक समोर, 4 मिनिटे 28 सेकंदांच्या टीझरमध्ये दिसला खतरनाक अंदाज










