आई झाल्यानंतर प्रीती झिंटाचे चित्रपटसृष्टीत कमबॅक, दिसणार काश्मिरी महिलेच्या भूमिकेत


बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने नुकताच आई झाल्याचा आनंद शेअर केला आहे. ती दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. तिचे चाहते अजूनही ती आई झाल्याचा आनंद साजरा करत होते. अशातच तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज मिळाले. आता अभिनेत्रीबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘डिंपल गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तब्बल ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रीतीने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाल्याची बातमी शेअर केली होती. या सरप्राईजनंतर, दुसरी धमाकेदार बातमी मिळाल्याने प्रीतीच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

प्रीती चित्रपटात करणार कमबॅक
प्रीती प्रदीर्घ ब्रेकनंतर दानिश रेंजूच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. चित्रपटाची कथा काश्मीरवर आधारित आहे. तरीही अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रोजेक्टचे काम सुरू झाले आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंगवर काम सुरू आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२२ मध्ये सुरू होणार आहे.

पाईपलाईनमध्ये आहे प्रोजेक्ट
काश्मीरचे आणि प्रीतीचे जुने नाते आहे. प्रीती काश्मीरच्या खोऱ्यात चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिने ‘वीर झारा’ आणि ‘मिशन काश्मीर’ सारख्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान या ठिकाणाचा आनंद लुटला होता. प्रीतीचे अजून २-३ चित्रपट आहेत, ज्यावर काम सुरू आहे. याशिवाय ती इतर प्रोजेक्टमध्येही सहभागी होऊ शकते. दानिश रेंजूने यापूर्वी स्वतंत्र चित्रपट निर्माता म्हणून ‘हाफ विंडो’ आणि ‘द इलिगल’ सारखे चित्रपट केले आहेत. दानिशच्या दिग्दर्शनाखाली प्रीती झिंटाच्या अभिनयाचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे.

याआधी प्रीती झिंटा २०१८ मध्ये ‘भैय्याजी सुपरहिट’मध्ये दिसली होती. हा चित्रपट काही विशेष दाखवू शकला नाही. स्वत: प्रीतीला या चित्रपटाकडून खूप आशा होत्या, पण हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही. मात्र, अभिनेत्रीचे चाहते तिला लवकरच रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये उर्फी दिसतेय एकदम स्टनिंग, तुम्ही पाहिला का फोटो?

-जाळ अन् धूर संगटच! नोराच्या ग्लॅमरस फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग, पडतोय लाईक्सचा पाऊस

-स्वत:चा जुना फोटो शेअर करत अनुपम यांनी नेटकऱ्यांना विचारला ‘हा’ प्रश्न, चाहते म्हणाले…


Latest Post

error: Content is protected !!