बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) नुकतीच जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीती सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर न्यू बॉर्न बेबीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रीतीने चाहत्यांसाठी तिच्या जुळ्या मुलांपैकी एकाची पहिली झलक शेअर केली आहे. प्रीती आणि तिचा पती जेन गुडइनफ सरोगसीद्वारे मुलगा जय आणि मुलगी जियाचे पालक झाले आहेत.
प्रीतीने मंगळवारी (७ डिसेंबर) संध्याकाळी तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवजात बाळाला छातीजवळ धरलेला एक फोटो शेअर केला. नवजात बाळाला फिकट निळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले आहे. प्रीतीने मुलाला छातीशी जपून ठेवले आहे जणू मुलाला आईपासून वेगळे व्हायचे नाही. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचा चेहरा दिसत नाही. या फोटोसाठी हसत हसत प्रीतीने पोझ दिली आहे. प्रीतीच्या खांद्यावर मुलाचे बर्पचे कापडही ठेवले आहे. प्रीतीने फोटोसोबत कॅप्शनही दिले आहे. ज्यात लिहीले होते की, “बर्प क्लॉथ्स, डायपर आणि बेबीज… मला ते सर्व आवडते…”
अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही प्रीती झिंटाच्या फोटोवर कमेंट केली आहे. प्रियांकाने प्रीतीच्या फोटोवर हार्ट इमोजी पाठवला आहे. प्रीती गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सरोगसीद्वारे आई बनली आहे. सोशल मीडियावर पतीसोबतचा एक फोटो शेअर करत प्रीतीने कॅप्शन लिहून चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. प्रीतीने १९९८ मध्ये ‘दिल’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले.
प्रीती चित्रपटात करणार कमबॅक
प्रीती प्रदीर्घ ब्रेकनंतर दानिश रेंजूच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. चित्रपटाची कथा काश्मीरवर आधारित आहे. तरीही अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, प्रोजेक्टचे काम सुरू झाले आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंगवर काम सुरू आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२२ मध्ये सुरू होणार आहे.
- हेही वाचा-
- भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये
- रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?
- BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही