Friday, July 5, 2024

प्रियांका चोप्राने रद्द केली माधुरी दीक्षितवर बनणारी सीरिज, कारण देत अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. माधुरीने ‘द फेम गेम’ सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यावर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अमेरिकन सीरिज बनवणार होती. मात्र आता ती बनवली जाणार नाही. याचा खुलासा खुद्द माधुरीनेच केला आहे.

प्रियांका चोप्राने २०१७ मध्ये जाहीर केले की, ती माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित अमेरिकन कॉमेडी सीरिज तयार करेल. या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शनही ‘द फेम गेम’चे दिग्दर्शक श्री राव करणार होते. या शोमध्ये माधुरी दीक्षित दिसणार होती, जिने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्यासाठी तिचे भरभराटीचे बॉलिवूड करिअर सोडले होते आणि ती अमेरिकेत राहात होती.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितने खुलासा केला की, “ही सीरिज आता बनवली जाणार नाही.” ती म्हणाली की, या शोबद्दल बरीच चर्चा झाली होती आणि श्री राव यांनी त्याच्या स्क्रिप्टवरही काम केले होते.

माधुरीने सांगितले की, “मात्र, ते मंजूर झाले नाही. आम्ही ते पिच करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ‘द फेम गेम’चे दिग्दर्शक श्री राव, ज्यांनी शोची स्क्रिप्ट लिहिली होती, ते देखील त्या प्रोजेक्टमध्ये सामील होते. पण कधी कधी काही गोष्टी घडतात तर कधी होत नाहीत. आम्ही प्रयत्न केला पण काम झाले नाही.”

माधुरी दीक्षितने पुढे स्पष्ट केले की, हा शो तिचे आत्मचरित्र नसून एक काल्पनिक कथा होती. जी तिच्या आयुष्यातील एका भागावर चित्रित केली जाणार होती. जी यूएसमध्ये असताना तिच्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. माधुरी दीक्षितने आता पुष्टी केली आहे की, “हे आता सुरू नाही आणि आम्ही त्यावर काम करत नाही.”

माधुरी दीक्षित सध्या तिच्या ओटीटी पदार्पण ‘द फेम गेम’मुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती एका बॉलिवूड स्टारची भूमिका साकारत आहे. जिला इंडस्ट्रीचा एक भाग समोर येतो जो बाहेरचे जग पाहू शकत नाही. ‘द फेम गेम’ या सीरिजमध्ये माधुरी दीक्षितसोबत संजय कपूर आणि मानव कौलही आहेत. माधुरीचे चाहते तिच्या पडद्यावर परतण्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ती शेवटची करण जोहरच्या ‘कलंक’मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा