×

जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता

अन्नू कपूर (Annu Kapoor) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. अनेक दर्जेदार चित्रपटात त्यांनी काम केले आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) अन्नू कपूर यांचा वाढदिवस असल्याने हिंदी चित्रपट जगतातील कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अन्नू कपूर आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचा गाजलेला किस्सा. 

अन्नू कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी चार दशके या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. १९८३ मध्ये त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेव्हापासुन त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना आकर्षित केले होते. अन्नू कपूर तसे वाद विवादापासून लांबच राहतात. मात्र २०११ मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत त्यांचा झालेला वाद चांगलाच गाजला होता.

अन्नू कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘ऐतराज’ चित्रपटात काम केले होते. त्यासोबतच दोघांनी विशाल भारद्वाज यांच्या ‘सात खून माफ’ चित्रपटात सुद्धा एकत्र काम होते. या चित्रपटात त्यांनी प्रियांका चोप्राच्या पतीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट रस्किन बॉन्डच्या पुस्तकावर आधारीत आहे. चित्रपटात इरफान खान (Irfaan Khan), नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), जॉन अब्राहम (John Abraham) अशा दिग्गज कलाकारांचा समावेश होता.

समोर आलेल्या बातमीनुसार, चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अन्नू कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला होता. हा वाद पुढे चांगलाच पेटला. यावेळी अन्नू कपूर म्हणाले होते की प्रियांका चोप्राच्या म्हणण्यानुसार, ते हीरो नसल्याने आणि दिसायला चांगले नसल्याने तिने त्यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला. इथूनच या वादाला सुरूवात झाली होती. अन्नू कपूर यांच्या या बोलण्यावर खुलासा करताना प्रियांका म्हणाली होती की, जर त्यांना इंटिमेट सीन करायचे असतील आणि अशी वाईट वक्तव्ये करायची असतील तर तशाच चित्रपटात काम करावे. प्रियांका चोप्राच्या या वक्तव्यावर बोलताना अन्नू कपूर यांनी, मी प्रियांकाला एक शब्दही बोललो नसल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी प्रियांकाला या गोष्टींना गांभिर्याने न घेण्याचा ही सल्ला दिला होता.

हेही वाचा –

Latest Post