Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड प्रियंकाने निकसोबत साजरी केली दिवाळी, लक्ष्मीपूजनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रियंकाने निकसोबत साजरी केली दिवाळी, लक्ष्मीपूजनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ती अनेकदा तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कामात इतकी व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास विसरत नाही. प्रियांका नेहमीच तिचा पती निकसोबतचे अनेक फोटो शेअर करते. नुकताच प्रियंका चोप्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दिवाळीच्या निमित्ताने खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.

प्रियांका अमेरिकेत असूनही तिकडेच प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे करत असते. एवढेच नाही, तर तिचा पती निक जोनसही तिच्यासोबत सर्व सण साजरे करताना दिसतो. प्रियांका सध्या युएसमध्ये असून, तिने तिथेच दिवाळी साजरी केली. यावेळी तिने तिचे आणि निकचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

प्रियांकाने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना जबरदस्त फॅशन गोलही दिले आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाने तिचे केस मोकळे सोडले असून, पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.  दुसरीकडे, निक जोनासनेही कुर्ता-पायजामा परिधान करत भारतीय अवतार परिधान केला आहे. या जोडप्याच्या हातात पूजेचे ताट आहे. पारंपारिक लूकमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः” प्रियांका चोप्राने पुढे लिहिले, “आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने, आम्ही तिची कृपा आणि विपुलता आमच्या घरी आमंत्रित करतो, दिवाळीच्या शुभेच्छा.”

प्रियांकानेही हॉलिवूड स्टार मिंडी केलिंगसोबत प्री-दिवाळी पार्टी केली होती. या प्री-दिवाळी पार्टीमध्ये प्रियांका फ्लोरल लेहेंगा आणि मिरर वर्क ब्लाऊजमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने तिचा दिवाळीचा लूक चोकर नेकपीस आणि कानातले घालून पूर्ण केला होता.

प्रियांकाचा हा लेहेंगा आणि तिचा हा लूकही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. डिझायनर अर्पिता मेहताने बनवलेल्या या लेहेंग्यात देसी गर्ल अप्रतिम दिसत होती. तिचे अनेक चाहते, मित्र आणि पती निकनेही तिच्या लूकचे कौतुक केले. प्रियांका आणि निक यांनी २०१८ साली हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले होते. दोघेही अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहतात. प्रियांका तिची संस्कृती आणि सण साजरे करते हे निकला आवडते.

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ॲमेझॉन प्राइमच्या ‘सीटाडेल’ या सीरीजचे शूटिंग करत आहे. याशिवाय ती ‘द मॅट्रिक्स ४’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा