Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पती निकचाही असणार कॅमियो

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा होय. प्रियांकाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे देणारी अभिनेत्री प्रियांका आता हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. प्रियांकाचा ‘लव्ह अगेन’ हा आगामी हॉलिवूड सिनेमे पुढील काही महिन्यात चित्रपटगृहात येऊन धडकणार आहे. यापूर्वी रोमँटिक कॉमेडी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात प्रियांकासोबतच हॉलिवूड अभिनेता सॅम ह्युगन दिसणार आहे. प्रियांकाच्या या सिनेमात तिचा पती आणि गायक निक जोनास हादेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.

प्रियांका चोप्रा हिने शेअर केला ‘लव्ह अगेन’चा ट्रेलर
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘लव्ह अगेन’ सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, मीरा म्हणजेच प्रियांका तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर आयुष्यात पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहे. ती जुन्या नंबरवर मेसेज पाठवत असते, जो आता रॉब बर्न्स म्हणजेच सॅम ह्युगन (Sam Heughan) वापरत आहे. रॉब हा एक पत्रकार आहे, जो मीराचा प्रामाणिकपणा आणि तिच्या मेसेजद्वारे तिच्याकडे आकर्षित होतो. तसेच, तो मीराच्या प्रेमातही पडतो.

अशाप्रकारे कथा पुढे जाते. प्रियांकाने ‘लव्ह अगेन’चा ट्रेलर (Love Again Trailer) शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही हा सिनेमा खूपच कठीण काळात बनवला आहे. अधिकतर वेळ आम्ही कुटुंबापासून दूर राहिलो आहे. मात्र, सेटवर प्रत्येक दिवस खास होता. खासकरून या स्टारकास्टसोबत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राचा आगामी बॉलिवूड सिनेमा
जिम स्ट्रॉस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘लव्ह अगेन’ सिनेमात प्रियांका चोप्रा आणि सॅम ह्युगन यांच्याव्यतिरिक्त हॉलिवूड गायिका सेलीन डायोनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा येत्या 12 मे, 2023 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा 2016मध्ये आलेल्या ‘एसएमएस फॉर डिज’ या जर्मन सिनेमावर आधारित आहे.

प्रियांकाच्या आगामी बॉलिवूड सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘जी ले जरा’ या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्याव्यतिरिक्त आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ या अभिनेत्रीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. (actress priyanka chopra hollywood movie love again trailer release see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो

हे देखील वाचा