Thursday, March 30, 2023

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो

जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे‘ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नुकतेच अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रिय व्यक्तीसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. यामध्ये अभिनेता प्रतीक बब्बर याचाही समावेश होता. विशेष म्हणजे, प्रतीकने यावेळी त्याच्या प्रेमाविषयीही खुलासा केला. त्याने सांगून टाकले की, तो कोणत्या अभिनेत्रीला डेट करत आहे. चला तर आपण जाणून घेऊयात…

प्रतीक बब्बर इंस्टाग्राम
अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा नेहमीच त्याच्या आयुष्यातील गोष्टी इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो. अशात त्याने ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त (Valentine Day) पुष्टी केली की, तो अभिनेत्री प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) हिला डेट करत आहे. त्याने गर्लफ्रेंड प्रियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने मॅचिंग टॅटूही फ्लॉन्ट केला आहे. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “पी बी,” असे लिहिले आहे. हा फोटो जोरदार व्हायरल होत असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prateik babbar (@_prat)

प्रतीकच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव
दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा लेक प्रतीक बब्बर याच्या पोस्टवर कमेंट करत अभिनेता मेयांक चांग याने कमेंट केली आहे की, “आता तू प्रत्येकाची उत्सुकता शांत केली आहे. मित्रा… खूप सुंदर फोटो.” तसेच, अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिने प्रतीकच्या पोस्टवर हृदयाचे इमोजी शेअर केले आहेत. याव्यतिरिक्त रोहित नायरने कमेंट करत “पीबी काय आहे?” असे विचारले आहे. एका युजरने तर असे म्हटले आहे की, “असे होऊ शकत नाही. एकच सिंगल होता, तोही निघून गेला.” तसेच, अनेक युजर्स विचारत आहेत की, ती मुलगी कोण आहे.

नाते का ठेवले लपवून?
माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी (Prateik Babbar And Priya Banerjee) हे मागील वर्षीच्या सुरुवातीला एका कॉमन फ्रेंडमार्फत एकमेकांना भेटले होते. ते दोघेही लाईमलाईटपासून दूर राहतात. ते एकमेकांना वर्षभरापासून ओळखतात. रिपोर्ट्सनुसार, प्रतीक बब्बर याने आधीच त्याच्या कुटुंबाला प्रियाबाबत सांगितले आहे. प्रतीक आणि प्रिया नेहमीच एकत्र बाहेर फिरायलाही जातात. मात्र, सध्या त्यांना त्यांचे गुप्त ठेवायचे आहे. कारण, त्याची पत्नी सान्या सागर हिच्यासोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. 23 जानेवारी, 2019मध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर प्रतीक कथितरीत्या लॉकडाऊनदरम्यान तिच्यापासून वेगळा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prateik babbar (@_prat)

‘इंडिया लॉकडाऊन’ शेवटचा सिनेमा
प्रतीकच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘इंडिया लॉकडाऊन’ या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले होते. यामध्ये श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा आणि प्रकाश बेलावाडी यांच्याही भूमिका होत्या. (actor prateik babbar flaunts matching tattoos with girlfriend priya banerjee read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा

हे देखील वाचा